अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:41 AM2018-12-21T00:41:15+5:302018-12-21T00:41:45+5:30

परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.

12215 deaths annually in accident | अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

अपघातात वर्षभरात १२२१५ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहिंगोली : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी प्रयत्न

दयाशिल इंगोले ।
हिंगोली : दिवसेंदिवस अपघाताचा आकडा फुगत चालला आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जातात. मात्र वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. परिणामी अपघाताच्या घटनांत वाढ होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. डिसेंबर २०१७ अखेर अपघातात राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या १२ हजार २१५ आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ११८ आहे.
हिंगोली जिल्ह्यात माहे डिसेंबर २०१७ अखेर एकूण २९४ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात ११८ जणांचा मृत्यू झाला. तर माहे सप्टेंबर २०१८ मध्ये रस्त्यावरील २२५ अपघातात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत माहे नोव्हेंबर २०१८ या महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ वाहनांवर कारवाई करून २ लाख ५७ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. शिवाय रस्तेही खराब असल्याने अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. उप-प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या वायुवेग पथकाने धडक कारवाई करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंड ठोठावला आहे.
यामध्ये हेल्मेट न वापराणाºया ३२ चालकांवर कारवाई करून ८ हजार रूपये दंड वसूल केला. तर सिटबेल्टचा वापर न करणाºया दोघांकडून १ हजार रूपये, ईन्शुरन्स नसलेल्या १५ वाहनांवर कारवाई करून ३० हजार ५०० रूपये, माल वाहतूक व प्रवासी वाहतूक दोघांकडून १५ हजार ४०० रूपये, अतिरिक्त भार असलेल्या १४ वाहनांवर कारवाई करून २ लाख २ हजार ६०० रूपये एकूण २ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
मागील चार वर्षांतील अपघाताची आकडेवारी
मागील चार वर्षांत जिल्ह्यात २०१४ मध्ये अपघाताच्या २७७ घटना घडल्या असून या अपघातात १०२ जणांचा मृत्यू झाला. तर ४७८ जण जखमी झाले होते. २०१५ मध्ये अपघाताच्या २८८ घटना असून १०९ जणांचा मृत्यू, तर ११६ जखमी. २०१६ मध्ये ३१६ अपघाताच्या घटना घडल्या. तर १२२ जणांचा मृत्यू झाला असून ३३५ जखमी झाले होते. २०१७ या वर्षांत २९४ अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये ११८ जणांचा मृत्यू झाला तर ३४२ जण जखमी झाले होते. सदर आकडेवारी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून प्राप्त आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांचे आवाहन...
दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. कार चालविताना सीटबेल्ट वापरावा. दारू पिऊन तसेच विनापरवाना व विमाविना वाहने चालवू नयेत. दोषी आढळल्यास चालकाचे लायसन ९० दिवसांसाठी निलंबित केले जाईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरटीओ अशोक पवार यांनी केले.
७० वाहनचालकांचे परवाने केले निलंबित
उप प्रादेशिक परिवहन विभागाने माहे आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१८ मध्ये कारवाई करून वाहन चालविताना दोषी आढळलेल्या ७० वाहन चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. आक्टोबर महिन्यात ५२ तर नोव्हेंबर महिन्यात १८ एकूण ७० वाहनचालक वाहने चालविताना दोषी आढळून आले होते.

Web Title: 12215 deaths annually in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.