तुमचा विसरभोळेपणा म्हणजे तुमचा आजारही असू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:57 PM2017-12-27T17:57:09+5:302017-12-27T17:57:56+5:30

पुर्वायुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांचे व्रण टिकतात आयुष्यभर..

 Your forgetfulness may be your disease ! | तुमचा विसरभोळेपणा म्हणजे तुमचा आजारही असू शकतो!

तुमचा विसरभोळेपणा म्हणजे तुमचा आजारही असू शकतो!

Next
ठळक मुद्देआपल्याला विसरण्याचा त्रास असेल तर त्याचं कारण पुर्वायुष्यातही असू शकतं.आपल्या आयुष्यात जर काही धक्कादायक घटना घडली असेल तर त्याचे व्रण कायम मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं.या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..

- मयूर पठाडे

तुमची मेमरी कशी आहे? बहुदा उत्तमच असेल. म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट अनंत काळपर्यंत लक्षात ठेऊ शकत नाही, ठेवता येत नाही आणि ठेवायचा प्रयत्नही करू नये. आपली प्रकृतीच अशी असते की, निसर्गत:च बिनकामाच्या गोष्टी विसरण्याकडे आपली टेण्डन्सी असते.
पण ही झाली सर्वसाधारण गोष्ट. बºयाच म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. अनेक जण आपल्या मेमरीच्या नावानं बोटंही मोडतात. काही जणांना आपण त्याबद्दल नावं ठेवतो, पण त्यांची आणि आपलीही मेमरी तशी सर्वसाधारणच असते. पण विसरण्याचा तुम्हाला आजारही असू शकतो. त्याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे आणि त्यावर उपचारही केले पाहिजेत.
लहान सहान गोष्टीही काही जण विसरतात, कारण पूर्वायुष्यातील काही गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. त्याचे व्रण कायम त्यांच्या मनावर राहतात आणि त्याचंच आजारात रुपांतर होतं. या आजाराचं नाव आहे ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर..
बºयाचदा लहानपणी काही लोकांच्या आयुष्यात काही वेदनादायी प्रसंग घडलेला असतो. कोणाला कोणी त्रास दिलेला असतो, एखाद्यावर, एखादीवर अतिप्रसंग घडलेला असतो, कोणी एखाद्या भयानक अपघातातून गेलेला असतो.. त्याचे व्रण आपण स्वत: विसरल्यासारखं आपल्याला वाटत असलं तरी त्याचे व्रण आपला पिच्छा आयुष्यभर सोडत नाहीत. त्याचंच रुपांतर मग ‘पीटीएसडी’ आजारात होतं.
या आजाराची नेमकी लक्षणं काय आणि ते कसं ओळखायचं हे पाहू या पुढच्या भागात..

Web Title:  Your forgetfulness may be your disease !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.