वजन कमी करताय?; 'हे' कुकिंग ऑइल्स ठरतात फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:51 PM2019-03-29T13:51:48+5:302019-03-29T13:52:14+5:30

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पदार्थांमध्ये  कुकिंग ऑइलचा वापर करणं टाळतात. परंतु कितीही काही केलं तरी ही गोष्ट खरी आहे की, तेलाशिवाय पदार्थांना अजिबातच चव नसते.

You may use cooking oils for weight loss | वजन कमी करताय?; 'हे' कुकिंग ऑइल्स ठरतात फायदेशीर!

वजन कमी करताय?; 'हे' कुकिंग ऑइल्स ठरतात फायदेशीर!

(Image Credit : nypost.com)

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पदार्थांमध्ये  कुकिंग ऑइलचा वापर करणं टाळतात. परंतु कितीही काही केलं तरी ही गोष्ट खरी आहे की, तेलाशिवाय पदार्थांना अजिबातच चव नसते. अनेकदा वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करताना पदार्थांच्या चवीशी तडजोड करावी लागते. यामुळेच अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न सोडूनच देतात. अशातच तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आता बिनधास्त कुकिंग ऑइल्सचा वापर करा. पण अशावेळी तुमच्या नेहमीच्या ऑइल्सऐवजी काही वेगळ्या ऑइल्सचा वापर करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया अशा काही कुकिंग ऑइल्सबाबत ज्यांचा वापर तुम्ही डाएटिंग करतानाही करू शकता. 

काही ऑइल्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असते. यांमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त यामध्ये अनेक हेल्थ बेनिफिट्स असतात. 

ऑलिव्ह ऑइल 

एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल सर्वात हेल्दी कुकिंग ऑइल्सपैकी एक मानलं जातं. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमन-ई आणि व्हिटॅमिन-के असतं. यासोबतच ऑलिव्ह ऑइलमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट्सही असतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

कॅनोला ऑइल (Canola oil)

कॅनोला ऑइलमध्ये 61% मोनोसॅच्युरेट फॅट असतं. तसेच फक्त 8% सॅच्युरेटेड फॅट्स असतात. दरम्यान, ऑलिव्ह ऑइलच्या तुलनेत यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट कमी असतात. 

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याच्या तेलाने अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहेत. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स मुबलक प्रमाणात असूनही यामधील अनेक पोषक तत्वांमुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स असतात. 

नट अ‍ॅन्ड सीड्स ऑइल 

अनेक प्रकारचे नट अ‍ॅन्ड सीड्स ऑइलमध्ये मुबलक प्रमाणात मोनोसेच्युरेटेड फॅट्स असतात. आणि हे जेवण तयार करण्यासाठी वापरता येतात. हेजलनट (पिंगल फळ) ऑइलमध्ये 82 टक्के मोनोसॅच्युरेटेड फॅट असतात. अशाप्रकारे सुर्यफुलाच्या तेलामध्ये 79 % मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही माहित म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही गोष्टीचा दावा करत नसून याचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: You may use cooking oils for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.