जाडेपणामुळे पोट कडक झालं असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:37 AM2019-04-26T11:37:54+5:302019-04-26T11:47:02+5:30

वजन वाढणं ही आताच्या लाइफस्टाइलमधील सामान्य बाब झाली आहे. पण वाढत्या वजनासोबतच वेगवेगळ्या समस्याही होतात.

Why some men belly is hard to touch, Know why it is dangerous | जाडेपणामुळे पोट कडक झालं असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारण!

जाडेपणामुळे पोट कडक झालं असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारण!

googlenewsNext

वजन वाढणं ही आताच्या लाइफस्टाइलमधील सामान्य बाब झाली आहे. पण वाढत्या वजनासोबतच वेगवेगळ्या समस्याही होतात. म्हणजे आता हेच बघा ना जर तुमचं वाढलेल्या वजनामुळे पोट बाहेर आलं असेल आणि त्याला स्पर्श केल्यावर पोट हार्ड किंवा टाइट वाटत असेल तर हा चांगला संकेत नाहीये. हे वजन वाढण्यापेक्षाही अधिक घातक ठरु शकतं. इतकेच नाही तर या संकेतावरुन हे कळून येतं की, तुम्ही हार्ट आणि डायबिटीज सोबतच हाय कोलेस्ट्रॉलनेही पीडित असू शकता. 

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हार्ड बेली फॅट स्मोकिंग आणि हाय कोलेस्ट्रॉलपेक्षाही घातक मानलं जातं. ही समस्या असण्यामागे एक नाही तर अनेक कारणे असू शकतात. यापासून बचावासाठी काही उपायही आहेत. ज्यांचा वापर करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता. चला जाणून घेऊ उपाय पण त्याआधी कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
पोट कडक होण्याची कारणे

१) जर तुमच्यात हार्ड फॅट तयार होत असेल

जर तुमच्या शरीरात विसेरल म्हणजेच हार्ड फॅट अधिक असेल तर पोट कडक होतं. विसेरल फॅट पोटाच्या मधे रिकाम्या जागेत राहतं आणि हे फारच कडक असतं. कडक फॅट तुमच्या पोटाच्या भींतीला बाहेरच्या बाजूने ढकलतं. हेच कारण आहे की, जेव्हा तुम्ही पोटाला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला पोट फार कडक किंवा हार्ड फिल होतं. नरम पोटाच्या मागे विसेरल फॅटमुळेच पोट इतकं कडक जाणवू लागतं. 

२) आनुवांशिक कारण

विसेरल फॅट तयार होण्याचं कारण आनुवांशिकही असू शकतं. हे असे जिन्स आहेत जे कंबरेच्या संबंधित असतात. ज्याने निर्धारित होतं की, तुमच्याकडे किती विसेरल फॅट आहे. 

३) तुम्ही पुरुष आहात

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, महिलांमध्ये पोटावरील चरबीमुळे वेगवेगळे आजार होण्याचा धोका अधिक असतो. पण पुरुषांमध्ये विसेरल फॅटमुळे आजार विकसित होण्याचा धोका अधिक वाढतो. 

४) संथ जीवनशैली

आपल्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि गतिहिन जीवनशैली सुद्धा कडक पोटाच्या समस्येसाठी जबाबदार आहे. एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, पुरुषांमध्ये गतिहीन जीवनशैलीमुळे विसेरल फॅट अधिक जमा होतं. तर महिलांमध्ये सबक्यूटेनियस फॅट जमा होतो. पण मेनोपॉजनंतर त्यांच्यातही विसेरस फॅट अधिक जमा होतं. 

५) अनहेल्दी डाएट

२०१० मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार बदलत्या लाइफस्टाइमुळे अनेकांच्या हेल्दी खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे पचन चांगल्याप्रकारे न होऊ शकणाऱ्या पदार्थांचं सेवनही वाढलं आहे. अशात कडधान्य खाणे आणि चरबी असलेले आणि साखर असलेले पदार्थ आहारातून दूर करुनच तुम्ही ही समस्या दूर करु शकता. 

(टिप - वरील लेखात सांगण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ माहितीसाठी आहेत. याकडे प्रोफेशनल चिकित्सा म्हणून बघू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा फिटनेस प्रोग्रॅम सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Web Title: Why some men belly is hard to touch, Know why it is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.