Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:07 AM2019-07-20T10:07:56+5:302019-07-20T10:10:02+5:30

जगभरातील लोकांसाठी सध्या सर्वात घातक असलेलं इन्फेक्शन म्हणजे इबोला. इबोला हे एक जीवघेणं इन्फेक्शन आहे.

WHO declared Ebola outbreak in Congo as international Emergency | Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित

Ebola चा रूग्ण आढळल्याने WHO ने केली मेडिकल इमर्जन्सी घोषित

Next

जगभरातील लोकांसाठी सध्या सर्वात घातक असलेलं इन्फेक्शन म्हणजे इबोला.इबोला हे एक जीवघेणं इन्फेक्शन आहे. या इन्फेक्शनमुळे होणाऱ्या मृत्युचा दर ९० टक्के आहे. सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचं तर या आजाराने पीडित १०० व्यक्तींपैकी ९० जणांचा हमखास मृत्यू होतो असं बोललं जातं. त्यामुळे इबोलाकडे आतापर्यंतचा सर्वात घातक प्रकोप म्हणून पाहिलं जात आहे.

आफ्रिकन देश कॉन्गोमध्ये ऑगस्ट २०१८ मध्ये सर्वातआधी इबोला पसरला होता आणि त्यावेळी साधारण १६०० लोकांचा मृत्यू झाला होता. आता या आजाराने आपले पाय आणखी पसरले आहेत. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ने कॉन्गोमध्ये इबोलाला इंटरनॅशनल मेडिकल इमर्जन्सी घोषित केलं आहे. कॉन्गोच्या बाहेर रवांडाच्या बॉर्डरवर गेल्या आठवड्यात गोमामध्ये इबोलाचे रूग्ण आढळले.

इबोला फार जास्त घातक - WHO

इबोला अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कारण या देशांमध्ये आवश्यक हेल्थकेअर आणि हेल्थ संबंधी रिसोर्सेजची कमतरता आहे. त्यामुळे हा आजार कंट्रोल करणं कठीण होत आहे. सुदैवाने भारत इबोलापासून आतापर्यंत सुरक्षित आहे. WHO ने इबोला आजाराला हाय रिस्क प्रॉब्लेम म्हणून घोषित केलं असून जगभरात सावधानतेचा इशारा दिला आहे.

कसं होतं हे इन्फेक्शन?

1) इबोला व्हायरस संक्रमित जनावरांना कापल्याने किंवा त्यांना खाल्ल्याने पसरतो.

२) इबोलाने पीडित रुग्णाच्या शरीरातून निघणाऱ्या घामामुळे, रक्तामुळे हा व्हायरस पसरतो. त्यामुळे इबोलाचे रूग्ण वेगळे ठेवले जातात.

३) या व्हायरसमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यावरही संक्रमणाचा धोका राहतो आणि मृतदेहाच्या संपर्कात येऊनही हा व्हायरस पसरू शकतो.

४) अशीही शक्यता आहे की, संक्रमित वटवाघुळांच्या मल-मूत्राच्या संपर्कात आल्यानेही इबोला व्हायरस पसरतो.

लक्षणे

- तोंड, कान, नाकातून रक्त वाहणे

- उलटी होणे, पोटात दुखणे

- अंगदुखी

- कमजोरी आणि फ्लूसारखी लक्षणे

- शरीरावर पुरळ येणे

इबोला असं नाव का पडलं?

हा आजार सर्वातआधी १९७६ मध्ये इबोला नदी परिसरातील गावात आढळला होता. त्यामुळेच या आजाराला इबोला नाव देण्यात आलं. हा आजार पीडित व्यक्तीच्या संपर्कात येऊन पसरतो. 

Web Title: WHO declared Ebola outbreak in Congo as international Emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.