मेटाबॉलिज्म आणि फिटनेसचा संबंध काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 10:12 AM2018-11-22T10:12:07+5:302018-11-22T10:12:37+5:30

वेगवेगळ्या फिटनेस जाहिरातींमधून अनेकांनी मेटाबॉलिज्म(चयापचय) हा शब्द ऐकलेला असतो, पण त्यांना याचं शरीरात काम काय असतं हेच माहीत नसतं.

What is Metabolism and its work? | मेटाबॉलिज्म आणि फिटनेसचा संबंध काय?

मेटाबॉलिज्म आणि फिटनेसचा संबंध काय?

googlenewsNext

(Image Credit : Active.com)

वेगवेगळ्या फिटनेस जाहिरातींमधून अनेकांनी मेटाबॉलिज्म(चयापचय) हा शब्द ऐकलेला असतो, पण त्यांना याचं शरीरात काम काय असतं हेच माहीत नसतं. मेटाबॉलिज्म वाढतं किंवा कमी होतं, हेही अनेकांनी ऐकलेलं असतं. मात्र तरीही नेमकी क्रिया, वजन वाढणे तसेच कमी होण्याचा आणि मेटाबॉलिज्मचा संबंध हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे मेटाबॉलिज्म नेमकं काय आहे आणि याची क्रिया काय असते हे जाणून घेऊया.

काय आहे मेटाबॉलिज्म?

मेटाबॉलिज्म ही शरीरात होणारी एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. यातून सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो. शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज पडते. आणखी साध्या शब्दात सांगायचं तर मेटाबॉलिज्मने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार करण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्मीची क्रिया आपल्या शरीरात २४ तास सुरु असते. इतकेच काय तर आपण आराम करत असतानाही याची क्रिया सुरु असते. 

मेटाबॉलिज्म फिट तर आरोग्य हिट

मेटाबॉलिज्म योग्य आणि नियंत्रणात असेल तर शरीर फिट राहतं. जर मेटाबॉलिज्म कमी किंवा जास्त झालं, तर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. याच कारणाने मेटाबॉलिज्म नियंत्रित ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करणे गरजेचे आहे. याने शरीर मजबूत होतं आणि वजनही नियंत्रणात राहतं. 

मेटाबॉलिज्म आणि जाडेपणाचा संबंध

मेटाबॉलिज्म जर योग्य असेल तर व्यक्ती वजन नियंत्रणात ठेवू शकतो. जेव्हाही शरीराचा बेसिक मेटाबॉलिज्म स्तर कमी होतो, तेव्हा शरीरात चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे मेटाबॉलिज्म नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं असतं. 

मेटाबॉलिज्मचं संतुलन गरजेचं

जर शरीरात मेटाबॉलिज्म प्रक्रिया थांबली तर शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया थांबतील. मेटाबॉलिज्म सामान्यपणे दोन प्रकारचा असतो, हाय मेटाबॉलिज्म आणि स्लो मेटाबॉलिज्म. मेटाबॉलिज्मचे हे दोन प्रकार आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे यो दोन्हींमध्ये संतुलन असणं गरजेचं असतं. 

आहारावर लक्ष देणे

मेटाबॉलिज्म फार जास्त आपल्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचाली यावर निर्भर असतो. चुकीचं खाणं-पिणं किंवा बराच वेळ काहीच न खाणं याने याची मेटाबॉलिज्मची समस्या वाढू शकते. त्यामुळे खाण्याच्या सर्व चुकीच्या सवयी जसे की, वेळेवर न खाणे, खाण्याची टाळाटाळ करणे याने मेटाबॉलिज्ममध्ये गडबड होऊ शकते. 

स्लो मेटाबॉलिज्म

जर शरीरात मेटाबॉलिज्म प्रक्रिया हळुवार झाली तर शरीर सुस्त होतं. अशात व्यक्ती डिप्रेशनमध्ये येऊ शकतो. थंडी किंवा गरमी जास्त होऊ लागते आणि ब्लड प्रेशरही कमी होऊ शकतो. तज्ज्ञांनुसार, मेटाबॉलिज्म कमी होण्याची अनेक कारणे आहेत. ज्यात हायपोथेडिज्म, कुपोषण, असंतुलित आहार, व्यायाम न करणे आणि अॅंट्री डिप्रेशन औषधांचा वापर करणे यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. 

हाय मेटाबॉलिज्म

मेटाबॉलिज्म जास्त झाल्याने शरीराचं तापमान वाढतं आणि हृदयाच्या ठोक्यांचा वेगही  वाढतो. अशा स्थितीत भूकही जास्त लागते आणि तापाची लक्षणेही दिसतात. हाय मेटाबॉलिज्मच्या कारणांबाबत तज्ज्ञ सांगतात की, यात ब्रेन हार्मोन किंवा थायरॉइड हार्मोन वाढणे, औषधांचा प्रभाव ही कारणे असू शकतात. 

Web Title: What is Metabolism and its work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.