विवेक शेट्टी उलगडणार मानवी मनाचा कप्पे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 11:16 AM2018-06-12T11:16:56+5:302018-06-12T16:46:56+5:30

विचारांतील सुस्पष्टता हे उत्क्रांतीचे सर्वांत मोठे स्वरूप आहे. मन खऱ्या अर्थाने जादू करू शकते, पण आपल्याला ते कसे वळवायचे हे जमायला हवे.

Vivek Shetty to spread the human mind | विवेक शेट्टी उलगडणार मानवी मनाचा कप्पे

विवेक शेट्टी उलगडणार मानवी मनाचा कप्पे

Next
रेरणादायी वक्ते, योगी आणि जादूगार विवेक शेट्टी आता मानवी मनाबद्दल आपले अमूल्य विचार आणि ज्ञान डीडी सह्याद्रीवर प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाच भागांचे प्रदर्शन येत्या 13 जून बुधवार सकाळी 8:00 वाजता प्रारंभ होणार आहे. 

या निमित्ताने बोलताना ते म्हणाले की, विचारांतील सुस्पष्टता हे उत्क्रांतीचे सर्वांत मोठे स्वरूप आहे. मन खऱ्या अर्थाने जादू करू शकते, पण आपल्याला ते कसे वळवायचे हे जमायला हवे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गॅजेटसाठीचे सॉफ्टवेअर आपल्याला माहीत असते परंतु मानवी मनाचे सॉफ्टवेअर आपल्याला अद्याप गवसलेले नाही, हाच एक मोठा प्रश्न आहे. हेच आपले मन आहे जे आपल्याला आपली ध्येये साध्य कऱण्यासाठी आणि आयुष्याला सर्वोत्तम शक्यता साध्य करण्यासाठी मदत करते. आपण आपल्या मनाचा ताबा घेऊया. आपल्या शरीरातील पेशी आणि आपली पावले एकाच लक्ष्यावर केंद्रित करून आणि सहभागाच्या एकात्मतेने टाकूया. आपल्या आयुष्याची सर्वोच्च क्षमता वापरणे, त्याची सर्वाधिक क्षमता वापरणे हे आपल्यासाठीचे आपले कर्तव्य आहे.

या भागांमधून मानवी मनाच्या सॉफ्टवेअरचे आणि त्याच्या विविध घटकांचे, त्याच्या प्रचंड क्षमता आणि वापर यांचे अत्यंत प्राथमिक ज्ञान मिळेल. रोजच्या सर्वसामान्य समस्या आणि परिणामकारक उपाययोजना यांच्यावरही लक्ष दिले गेले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मानवी मनांसाठी अत्यंत वेगळे प्रयत्न अनेक प्रेक्षकांसाठी खूप वेगळे ठरतील. आपण शरीराला व्यायाम देतो तसेच आपल्या मनालाही व्यायाम देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी किती जणांना मानवी मनासाठीचे व्यायाम आणि त्याची निरनिराळी उद्दिष्टे माहीत आहेत? या व्यायामांमधून आपल्या आयुष्याची दिशा बदलते आणि आयुष्यातील सर्वोच्च क्षमतेचा वाप करता येतो. 

 
श्री. विवेक शेट्टी, हेड होंको, इंडस कम्युनिकेशन्स हे एक प्रेरणादायी वक्ते असून जीवन विज्ञान आणि गूढ ज्ञानावर त्यांचा भर असतो. ते मागील १५ वर्षांपासून या क्षेत्रात असून त्यांनी ४०० पेक्षा अधिक व्याख्याने आणि भाषणे दिली आहेत. त्यांनी ही भाषणे आघाडीचे अनेक कॉर्पोरेट समूह, व्यवस्थापन संस्था, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, आंतरराष्ट्रीय शाळा आणि विविध प्रकारच्या व्यवस्थापन फोरम्सवर दिली आहेत. ते मनाचे व्यवस्थापन आणि आवाज प्रशिक्षण या विषयांवर नियमितपणे वर्ग चालवतात.
 

त्यांचे ट्विटरवर सुमारे दोन लाख वीस हजार अनुयायी आहेत आणि इन्स्टाग्रामवर एक लाख पंचवीस हजार अनुयायी आहेत आणि त्यांची संख्या प्रत्येक तासाला वाढते आहे. ते आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्या, बिझनेस हाऊस आणि सेलिब्रिटींना जाहिरात, जनसंपर्क, इव्हेंट मॅनेजमेंट आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये अद्ययावत सेवा देणाऱ्या ३६० अंशातील संवाद सेवांच्या इंडस कम्युनिकेशन्सचे प्रमुख आहेत. त्यांना जनसंपर्कातील आणि ब्रँडिंगमधील सामाजिक परिणाम साध्य करण्यातील सर्वोत्तमतेसाठी २०१६ चा नवशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
 

त्यांना संगीताची विशेष आवड आहे आणि देशभरात आघाडीच्या उत्सवांमध्ये आपले कार्यक्रम सादर कऱणाऱ्या सहा सदस्यांच्या बँडमध्ये प्रमुख गायक आहेत. २०१२ मध्ये त्यांना मेल़डियस व्हॉइस ऑफ दि इयरसाठी पंचम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांचा योगावर प्रचंड विश्वास आहे आणि ते दररोज न चुकता योगासने करतात. एक खऱ्या अर्थाने अष्टावधानी व्यक्तिमत्व असलेले विवेक शेट्टी व्यवस्थापन, प्रेरणा, योग लेखन, गायन आणि निवेदन अत्यंत सहजपणे आणि उत्तम पद्धतीने करतात.

Web Title: Vivek Shetty to spread the human mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.