टॉयलेटमध्ये मोबाइल वापरल्याने होईल 'ही' गंभीर समस्या, उठण्या-बसण्याचे होतील वांधे!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:50 AM2024-03-13T10:50:37+5:302024-03-13T10:51:45+5:30

Piles Reason : आज बरेच लोक टॉयलेटमध्येही तासंतास मोबाइल बघत असतात. याचे त्यांना गंभीर परिमाण भोगावे लागतात.

Using smartphone in the toilet may give you piles | टॉयलेटमध्ये मोबाइल वापरल्याने होईल 'ही' गंभीर समस्या, उठण्या-बसण्याचे होतील वांधे!

टॉयलेटमध्ये मोबाइल वापरल्याने होईल 'ही' गंभीर समस्या, उठण्या-बसण्याचे होतील वांधे!

Piles Reason : अलिकडे आपण बघतो की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोबाइलची सवय लागली आहे. दिवसभर कित्येक तास मोबाइल बघण्यातच जातो. कधी सोशल मीडिया पोस्ट, कधी व्हिडीओ तर कधी सिनेमे. पण अनेकांना याची कल्पना नसते की, यामुळे त्यांच्या डोळ्यांसोबतच त्यांच्या आरोग्याचं किती नुकसान होत आहे.

आज बरेच लोक टॉयलेटमध्येही तासंतास मोबाइल बघत असतात. याचे त्यांना गंभीर परिमाण भोगावे लागतात. टॉयलेटमध्ये मोबाइल फोन वापरल्याने गंभीर समस्या म्हणजे मुळव्याध होण्याची दाट शक्यता असते, असं एका डॉक्टरांनी सांगितलं. ही समस्या झाली तर तुम्हाला उठण्या-बसण्याची आणि नैसर्गिक विधी करण्याची समस्या होऊ शकते. यात खूप वेदना होतात.

मुळव्याध म्हणजे काय?

गुदद्वाराच्या आतल्या आणि बाहेरच्या भागातील फुगलेल्या आणि सुजलेल्या वेदना होणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध म्हणतात.

लक्षणे

- शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे

- शौचास बसल्यावर गुदद्वारेत आग आणि वेदना होणे

- शौचाच्या ठिकाणी खाज येणे

- शौचाच्या वेळेला मांसत भाग बाहेर येणे

काय काळजी घ्याल?

जळगावचे डॉ. रोहन पाटील यांनी याबाबत सांगितले की, 'अलिकडे लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात. त्यामुळे ते आत आधीपेक्षा जास्त वेळ घालवू लागले आहेत. याने पाइल्सचा धोका जास्त राहतो. यावर उपाय म्हणजे टॉयलेटमध्ये मोबाइल वापरू नका. तसेच पेपर किंवा पुस्तकं वाचू नका. तसेच इंडियन टॉयलेट सीटचा वापर करा.

मुळव्याधीची इतर मुख्य कारणे

1) मलाबष्टंभ अथवा बद्धकोष्ठता (Constipation)

2) जास्त तिखट, जास्त तेलकट तसेच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे

3) मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन

4) सततचे बैठे काम

5) अति जागरण

6) जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा

7) कोरडे आणि शिळे अन्न खाणे

8) अनुवांशिक

Web Title: Using smartphone in the toilet may give you piles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.