पोटाचा कॅन्सर दूर करण्यासाठी हळद ठरू शकते फायदेशीर - तज्ज्ञ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 10:53 AM2019-04-30T10:53:51+5:302019-04-30T10:54:12+5:30

हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारं करक्यूमिन पोटाचा कर्करोग म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे.

Turmeric may prove beneficial in treating gastric cancer cases says Expert | पोटाचा कॅन्सर दूर करण्यासाठी हळद ठरू शकते फायदेशीर - तज्ज्ञ 

पोटाचा कॅन्सर दूर करण्यासाठी हळद ठरू शकते फायदेशीर - तज्ज्ञ 

googlenewsNext

हळदीच्या झाडाच्या मुळांमधून निघणारं करक्यूमिन पोटाचा कर्करोग म्हणजेच गॅस्ट्रिक कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पाराच्या संशोधकांनी ब्राझीलमध्ये याची माहिती दिली. करक्यूमिनसोबतच हिस्टोन गतिविधीला संशोधित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या तत्वांमध्ये कोलकेल्सीफेरोल, रेस्वेराट्रोल, क्वेलसेटिन, गार्सिनॉल आणि सोडियम ब्यूटायरेट हेही प्रमुख होते. 

गॅस्ट्रिक कॅन्सरने मृत्यूचा दर ७२ टक्के

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड इंटरनॅशनलच्या पोटाच्या कॅन्सरसंबंधी आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी गॅस्ट्रिक कॅन्सरचे साधारण ९ लाख ५२ हजार नवीन केसेस समोर येतात, यातील जवळपास ७ लाख २३ हजार लोकांना जीव गमवाव लागतो. म्हणजे जगभरात गॅस्ट्रिक कॅन्सरने मृत्यू होण्याचा दर हा ७२ टक्के आहे. भारतात पोटाच्या कॅन्सरच्या दरवर्षी जवळपास ६२ हजार केसेस आढळतात आणि भारतात पोटाच्या कॅन्सरने मृत्यू होण्याचा दर हा ८० टक्के इतका आहे. 

पोटाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणे

पोटाच्या कॅन्सर हा अनेक वर्षात हळूहळू विकसित होतो, त्यामुळे सुरुवातीला कोणतेही स्पष्ट लक्षण दिसत नाही. सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील. 

- भूक कमी होणे

- वजन कमी होणे

- पोटात वेदना होणे

- अपचन आणि मळमळ होणे

- उलटी होणे आणि सोबतच उलटीतून रक्त येणे

- पोटात सूट येणे

- विष्ठेतून रक्त येणे

पोटाच्या कॅन्सरची कारणे

वरील लक्षणांपैकी काहींवर उपचार केले जाऊ शकतात, कारण ते दिसून पडतात आणि गायब होता. तर काही लक्षणे उपचारानंतरही दिसतात. हा रोग वाढण्याला तणाव, धुम्रपान आणि अल्कोहोल या गोष्टी जबाबदार असतात. धुम्रपानामुळे स्थिती आणखी खराब होते. भारतात अनेक ठिकाणांवर आहारात फायबरचं प्रमाण कमी राहतं. अधिक मसालेदार आणि मांसाहारामुळे पोटात सूज येऊ शकते आणि ज्याकडे दुर्लक्ष केलं तर कॅन्सर होऊ शकतो. 

यावर हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी एका हेल्थ वेबसाइटला सांगितले की, 'पोटाच्या कॅन्सरसाठी योग्यप्रमाणात फॉलो-अप आणि पोस्ट-ट्रीटमेंटची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित तपासणीसाठी टीमसोबत संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीला हेल्थ टीमला दर ३ ते ६ महिन्यांनी भेटण्याचा सल्ला दिली जातो. त्यानंतर वर्षातून एकदा भेटावं लागू शकतं. पोटाच्या कॅन्सरनंतर जीवन तणावपूर्ण होतं. मात्र योग्य उपचार, जीवनशैलीमध्ये बदल आणि डॉक्टरांच्या मदतीने रूग्ण ठिक होऊ शकतो'.

Web Title: Turmeric may prove beneficial in treating gastric cancer cases says Expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.