Tips to make skin beautiful | त्वचा सुंदर बनविण्यासाठी टिप्स
त्वचा सुंदर बनविण्यासाठी टिप्स

- अमित सारडा
जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ तुम्ही, आम्ही आणि सर्व जण हा दिवस आपल्या आयुष्यातल्या खास व्यक्तींसोबत साजरा करतो. त्यांना छान वाटणा-या विशेष गोष्टी करतो. तुम्ही या दिवशी स्वत:वरही प्रेम करून स्वत:बद्दल छान वाटायला हवे, यासाठी तुमच्या त्वचेची थोडीशी काळजी घेतली, तिच्यावर प्रेम केले, तर त्वचेलाही पुन्हा तारुण्याची भेट बहाल होईल.
मेकअप प्रायमरचा वापर करा
तुम्ही मेकअप करणार असाल, तर तो करण्याच्या आधी आॅलिव्ह आॅइलचा वापर नैसर्गिक मेकअप प्रायमर म्हणून करा. त्यामुळे तुमची त्वचा आर्द्र राहील आणि तिला आतून पोषण मिळेल.
कसा वापर करावा -
मेकअप करण्याच्या आधी आॅलिव्ह आॅइलच्या काही थेंबांनी चेहºयाला मसाज करा. त्यामुळे त्वचा आणि मेकअप यांच्या दरम्यान एक संरक्षक भिंत तयार होईल. मेकअपमध्ये वापरण्यात येणारे रसायन त्वचेसाठी कधी-कधी हानिकारक ठरते. आॅलिव्ह आॅइल त्वचेचे अतिरिक्त नुकसान होण्यापासून बचाव करते.
नैसर्गिक सनस्क्रीनचा वापर
सूर्याच्या किरणांमुळे होणारे हानिकारक परिणाम लगेच जाणवत नाहीत. मात्र, दीर्घकाळाचा विचार केला, तर त्वचेला नुकसान होत राहते. हळूहळू चेहºयावर पडणाºया सुरकुत्या, रेषा, डाग हे सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे होणारे परिणाम आहेत. त्यामुळे सनस्क्रीन वापरणे अत्यावश्यक आहे. मात्र, रसायनांचा समावेश असणारे लोशन अथवा स्क्रीन नसावे. तिळाचे तेल नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून उत्तम आहे. कारण त्यात असलेल्या एसपीएफमुळे सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून रक्षण होते.
कसा वापर करावा - प्रखर उन्हात बाहेर पडण्याआधी तिळाच्या तेलाचे काही थेंब त्वचेवर लावावे.
नैसर्गिक मेकअप रिमूव्हर
मेकअप काढणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्वचेच्या रंध्रांना श्वास घेणे आवश्यक असते. दीर्घकाळापर्यंत मेकअप चेहºयावर ठेवल्यास, ही रंध्रे बंद होतात आणि परिणाम म्हणून पुरळ अथवा डागांची समस्या उद्भवते. जोजोबा आॅइल उत्तम क्लेन्जर म्हणून ओळखले जाते.
कशा प्रकारे वापर करावा - कापसाच्या बोळ्याने जोजोबा आॅइलचे काही थेंब चेहºयावर लावून मेकअप काढावा. हे आॅइल उत्तम क्लेन्जर असून, त्वचेत राहिलेले मेकअपचे कण खोलवर शिरून काढते.
(ब्युटी अँड वेलनेस एक्स्पर्ट)


Web Title: Tips to make skin beautiful
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.