Diwali 2019 : अस्थमा, हृदयविकार असलेल्यांनी दिवाळीत 'अशी' घ्यावी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:57 PM2019-10-27T13:57:32+5:302019-10-27T14:01:15+5:30

दिवाळीमध्ये सर्वात जास्त आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो तो म्हणजे, अस्थमाच्या रूग्णांना आणि हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना. एवढचं नाहीतर या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडणंही अवघड होतं.

Tips for asthma and heart patient in diwali 2019 | Diwali 2019 : अस्थमा, हृदयविकार असलेल्यांनी दिवाळीत 'अशी' घ्यावी काळजी

Diwali 2019 : अस्थमा, हृदयविकार असलेल्यांनी दिवाळीत 'अशी' घ्यावी काळजी

Next

दिवाळीमध्ये सर्वात जास्त आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो तो म्हणजे, अस्थमाच्या रूग्णांना आणि हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना. एवढचं नाहीतर या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडणंही अवघड होतं. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराचा या लोकांना त्रास होतो. त्यामुळे दिवाळीत अस्थमा आणि हृदय विकारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उत्साहाच्या या वातावरणात जर कोणतीही बाधा येऊ नये असं वाटत असेल तर चुकूनही आरोग्याकडे दुर्लक्षं करू नका. 

आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. 

अस्थमाच्या रूग्णांसाठी दिवाळी सेफ्टि टिप्स : 

1. दिवाळीच्या दिवशी जेव्हा फटाक्यांमुळे वातावरण प्रदूषित होतं, त्यावेळी घरातून बाहेर अजिबात पडू नका. कारण फटाक्यांमुळे होणाऱ्या धूरामध्ये कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर ऑक्साइड हवेमध्ये मिसळून जातात. श्वासामार्फत हे फुफ्फुसांमध्ये जाऊन अ‍ॅलर्जीसाठी कारणीभूत ठरतात. यामुळे छातीमध्ये जळजळ, श्वास घेण्यास त्रास, अस्वस्थ वाटणं तसेच अस्थमाचा अटॅकही येऊ शकतो. त्यामुळे या दिवसांत पोल्युशन मास्कचा वापर करा. इन्हेलर, नेबुलाइजर यांसारखी औषधं स्वतःजवळ ठेवा. 
2. घराची साफ-सफाई सुरू असताना दूर राहा. स्वतः साफ सफाई अजिबात करू नका. घरात जर साफ-सफाई सुरू असेल तर मास्कचा वापर करा. धूळ-माती आणि अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी सर्व उपाय करा. अन्थथा अटॅक येऊ शकतो. 
3. घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. 
4. अस्थमाचा अटॅक आल्यानंतर किंवा इतर कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर अजिबात उशिर न करता डॉक्टरांकडून तपासणी करा. तुमचं इन्हेलर सतत स्वतःसोबत ठेवा. 

हृदय रोगांनी त्रस्त असणाऱ्यांनी अशी घ्यावी काळजी : 

1. हृदय रोगाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांनी दिवाळीमध्ये फटाक्यांपासून दूर राहणं आवश्यक असतं. तसेच स्ट्रेस, हार्ट रेट वाढणं, भिती वाटणं, अस्वस्थता, हार्ट अटॅकचा धोका यांसारख्या समस्या उद्भवण्याचीही भिती असते. त्यामुळे यादिवसांमध्ये खाण्या-पिण्याच्या बाबतीतही सावधान राहणं गरजेचं असतं. 
2. जास्त मिठ असलेले पदार्थ किंवा जास्त गोड पदार्थांचं सेवन करणं टाळा. त्याऐवजी संतुलित आहार म्हणजेच, ड्रायफ्रुट्स किंवा फळांचा समावेश करा. तसेच अजिबात ताण घेऊ नका. 
3. नियमितपणे औषधांचं सेवन करा, फटाक्यांपासून दूरच राहा. 
4. वेळेवर झोपा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Tips for asthma and heart patient in diwali 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.