सतत वेळेची कमतरता जाणवणं हा केवळ मेंदूचा भ्रम! - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 10:09 AM2019-04-08T10:09:56+5:302019-04-08T10:13:02+5:30

अनेकजण अनेकदा असं म्हणत असतात की, त्यांना एखादी गोष्ट करायची आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळच नाहीये.

Time pressure is only creation of mind | सतत वेळेची कमतरता जाणवणं हा केवळ मेंदूचा भ्रम! - सर्व्हे

सतत वेळेची कमतरता जाणवणं हा केवळ मेंदूचा भ्रम! - सर्व्हे

(Image Credit : faithandenterprise.org)

अनेकजण अनेकदा असं म्हणत असतात की, त्यांना एखादी गोष्ट करायची आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळच नाहीये. याला टाइम प्रेशर असं म्हटलं जातं. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्व्हेत सहभागी अर्ध्या लोकांचं म्हणणं होतं की, त्यांच्याकडे वेळ नाहीये. टाइम प्रेशर एक अशी धारणा आहे ज्यात तुम्हाला आपल्याला वाटत असतं की, आपल्याला जे करायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे वेळच नाहीये. पण एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, टाइम प्रेशरबाबतची हा विचार चुकीचा आहे. 

एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, १९६५ ते २००३ सरासरी अमेरिकेत वर्कवीक तीन तासांचा आहे तर आराम करण्याचा वेळ वाढला आहे. जगातल्या अनेक ठिकाणांवर वर्कवीक लहान झाला. मग टाइम प्रेशर वाढला कसा? ग्रेटर गुड मॅगझिननुसार, वेळेची कमतरता जाणवणे केवळ मेंदूचा भ्रम आहे. दरवेळी वेळ नाही असं रडत बसण्यापेक्षा चांगलं आहे की, थोडा वेळ काढून आपल्या सायकॉलॉजीवर काम केलं जावं. 

रिपोर्टनुसार, तुम्हाला असलेलं टाइम प्रेशर खरं आहे की केवळ भ्रम हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वत:ला चार प्रश्न विचारू शकता. पहिला प्रश्न हा विचारा की, तुम्ही जे करता ते तुम्ही एन्जॉय करता का? दुसरा प्रश्न काय तुमचे गोल आणि कामं तुमच्या डोक्यात योग्यप्रकारे आहेत? जर नाही तर मग सतत तुम्हाला काम पेंडिंग वाटतं का किंवा त्यासाठी तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करता?

जर असं असेल तर तुमच्या आवडीचं किंवा मजेदार काम सुद्धा टाइम प्रेशर जाणवेल. उदाहरण सांगायचं तर जर घरी जेवण करणे आणि ऑफिसमधील काम जर समान लेखले तर स्ट्रेस वाटेल. तेच जर घरी जेवण करण्याची तुलना तुम्ही ऑफिसच्या कामासोबत केली नाही आणि याने तुमची प्रॉडक्टिविटी वाढण्यास मदत होईल असा विचार केला तर तुम्ही हे एन्जॉय कराल.

तिसरा प्रश्न हा विचारा की, तुम्हाला वाटतं का की, तुमचं जीवनावर नियंत्रण आहे? मुळात टाइम प्रेशर तेव्हा जाणवायला लागतं जेव्हा तुम्ही तुमचं नियंत्रण गमावू लागत असता. उदाहरण द्यायचं तर हे की, एखाद्या मिटींगला जाताना तुम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकलात. 

शेवटचा आणि चौथा प्रश्न हा की, तुम्ही वेळेची किती किंमत करता? अनेक सर्व्हेंमधून समोर आलं आहे की, ज्या लोकांकडे जास्त पैसे असतात त्यांना जास्त टाइम प्रेशर जाणवतं. पण मूळ मुद्दा हा आहे की, टाइम प्रेशर हा केवळ तुमच्या डोक्याचा आणि मनाचा एक भ्रम, एक खेळ आहे. तुम्ही तुमच्या अॅटिट्यूडमध्ये बदल आणूण हे प्रेशर कमी करू शकता. 

Web Title: Time pressure is only creation of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.