मायग्रेनच्या त्रासाने वैतागले आहात? या टिप्सने मिळेल तुम्हाला आराम...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:24 AM2019-07-16T10:24:58+5:302019-07-16T10:30:11+5:30

मायग्रेनची समस्या असेल तर असह्य वेदना होतात. आज दर सात लोकांपैकी एका व्यक्तीला मायग्रेनची समस्या बघायला मिळते.

These tips will help you get rid off migraine pain | मायग्रेनच्या त्रासाने वैतागले आहात? या टिप्सने मिळेल तुम्हाला आराम...

मायग्रेनच्या त्रासाने वैतागले आहात? या टिप्सने मिळेल तुम्हाला आराम...

googlenewsNext

(Image Credit : KERA News)

मायग्रेनची समस्या असेल तर असह्य वेदना होतात. आज दर सात लोकांपैकी एका व्यक्तीला मायग्रेनची समस्या बघायला मिळते. मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना आणि डोकेदुखीत फरक आहे. मायग्रेनमध्ये वेदना डोक्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूने होते. ही डोकेदुखी २ तास ते ७२ तासांपर्यंत राहू शकते. अनेकदा वेदना सुरू होण्यापूर्वी रूग्णाला काही संकेतही मिळतात, ज्याने त्यांना हे कळतं की, वेदना होणार आहे. मायग्रेन ही एक गंभीर समस्या असून बरी होण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे मायग्रेनने पीडित लोकांनी आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

मायग्रेनची लक्षणे आणि कारणे

(Image Credit : matzav.com)

मायग्रेनमध्ये डोकेदुखी व्यतिरिक्त मळमळ होणे, डोळे आणि कानाच्या मागे वेदना होणे, आवाज आणि प्रकाशाबाबत अधिक संवेदनशील असणे ही लक्षणे दिसतात. मायग्रेनच्या समस्येने ग्रस्त लोकांपैकी साधारण २० ते २५ टक्के लोकांमध्ये दिसण्याची आणि ऐकण्याची समस्याही बघायला मिळते. मायग्रेनचा त्रास हा ब्लड सेल्स मोठ्या झाल्याने आणि नर्व्ह फायबरकडून केमिकल रिलीज झाल्या कारणाने होतं.

या गोष्टींची घ्या काळजी

(Image Credit : Saebo)

१) तज्ज्ञ सांगतात की, ज्या लोकांना मायग्रेनची समस्या आहे, त्यांनी कोणत्या गोष्टी मायग्रेनसाठी कारणीभूत आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. तसेच कोणती औषधे असतात, वेदना किती होते, ही समस्या मासिक पाळीवेळी होते का? कुठे वेदना होतात त्यासोबतच उलटी किंवा बघण्या-ऐकण्यात समस्या होते का? या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.

(Image Credit : Advanced Pain Care)

२) खाण्या-पिण्यावर योग्य लक्ष न दिल्याने मायग्रेनची वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे. खाण्या-पिण्याबाबत योग्य माहिती नसल्याने अनेकजण काहीही खातात. त्यामुळे मायग्रेनची समस्या होऊ लागते. मायग्रेनच्या त्रासापासून बचाव करायचा असेल तर आहारावर विशेष लक्ष द्यावं लागतं.

(Image Credit : Best Health Magazine)

३) मायग्रेनची समस्या असेल तर लोक अनेकदा वेदना टाळण्यासाठी पेनकिलर घेतात. त्यांना वाटत असतं की, पेनकिलर घेतल्याने त्यांना लगेच आराम मिळेल. याने काही प्रमाणात आराम मिळतही असेल पण जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्याने तुमचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेऊ नका.

(Image Credit : ArtofLiving.org)

४) डॉक्टर सांगतात की, ज्या महिला मासिक पाळी, प्रेग्नेंसी किंवा मेनॉपॉजमधून जात असतील तर त्यांना मायग्रेनची समस्या अधिक होऊ शकते. त्यामुळे हार्मोन्सचं संतुलन कायम ठेवण्यासाठी त्यांनी चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारात प्रोटीन, कडधान्य यांचं अधिक प्रमाण असावं. तसेच साखरेचं सेवनही कमी करायला हवं.

Web Title: These tips will help you get rid off migraine pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.