Take care of this in pregnancy! | ​गरोदरपणात घ्या 'ही' काळजी!

जेव्हा महिला आई बनते तेव्हा तिला होणारा आनंद हा जगावेगळा असतो. प्रसुती नंतर आपला बाळ सुदृढ असावा असेही त्या आईला वाटत असते. म्हणूनच गरोदरपणात आईने विशेष काळजी घ्यायला हवी. कारण आईच्या आरोग्याचा प्रभाव होणा:या बाळावर देखील पडतो. खानपानाशिवाय ब:याच अशा गोष्टी आहेत ज्या गर्भस्थ शिशुवर प्रभाव टाकते. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत..

* बाळ सुदृढपणो जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणो आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणो आवश्यक आहे.

* गर्भधारणाच्या वेळेस प्रत्येक आईने ब्लड ग्रुप, विशेषत: आर. एच. फॅक्टरची चाचणी करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय हिमोग्लोबिनची देखील चाचणी वेळो वेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करायला पाहिजे. 

* प्रत्येक मातेने आपले हिमोग्लोबीन दर तीन महिन्यांनी तपासणो आवश्यक आहे. हिमोग्लोबीन हे नेहमीकरिता अकरा ग्रॅमच्यावर असणो गरजेचे असते. लघवीमध्ये प्रोटीन अल्बोमीन बघण्याकरिता लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घेणो गरजेचे असते. लघवीमध्ये अल्बोमीनचे प्रमाण जास्त असल्यास गरोदरमातेच्या पायावर, अंगावर सूज येण्याची शक्यता असते. प्रत्येक मातेने आपले रक्तदाब तपासून घ्यावे.

* जर आपणास आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार असतील तर गर्भावस्था दरम्यान नेमाने औषध घेऊन या आजारांवर नियंत्रण ठेवावे. या बाबतीत आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा.

* गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या दिवसात जीव घाबरणो, उलट्या होणो, रक्तदाब सारख्या समस्या असू शकता, अशात डॉक्टरकडून चेकअप जरून करवून घ्यावा. गर्भावस्थे दरम्यान पोटात दुखणो आणि रक्तस्नव सुरू झाल्यास तर त्याच्याकडे गंभीरतेने बघावे आणि त्वरीत डॉक्टरांची भेट घ्यावी. 

* गर्भावस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्या बिना कुठलेही औषध घेऊ नये. गर्भावस्थे लागणारे आवश्यक इंजक्शन घ्यावे आणि आयरनच्यांचे सेवन केले पाहिजे. 

* चेहरा किंवा हात-पायात येणारी असामान्य सूज, डोकेदुखी, डोळ्यातून धुंधला दिखना आणि मूत्र त्याग करताना अडचण येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

* गर्भधारणाच्या दरम्यान निर्धारित कॅलोरी आणि पौष्टिक आहार घेणो फारच गरजेचे आहे, जसे धान्य, भाज्या, फळ, विना फॅट्सचे मटण, कमी वसेयुक्त दुध, नारळ पाणी इत्यादी.   

* गर्भावस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक इंजक्शन घ्यावे तसेच आयरनच्यांचे सेवन करावे. या दरम्यान चेहरा किंवा हात-पायात येणारी असामान्य सूज, डोकेदुखी आणि मूत्र त्याग करताना अडचण येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

* गर्भधारणाच्या दरम्यान धान्य, भाज्या, फळ, विना फॅट्सचे मटण, कमी वसेयुक्त दुध, नारळ पाणी आदी निर्धारित कॅलोरी आणि पौष्टिक आहार घेणो फारच गरजेचे आहे.  

 
Web Title: Take care of this in pregnancy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.