वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:12 PM2019-05-01T15:12:18+5:302019-05-01T15:15:13+5:30

उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं.

Swimming can help you to lose weight do these type of swimming to lose weight | वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे

वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे

googlenewsNext

उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं. स्वमिंग करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पम तुम्हाला माहीत आहे का? स्विमिंग करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच स्विमिंगमुळे वजन कमी करण्यासाठीही मदत होते. आश्चर्य वाटलं असेल ना? द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, स्विमिंग केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. 

हेल्दी डाएट आणि प्रत्येक दिवशी एक्सरसाइज केल्याने वजन जास्तीत जास्त प्रमाणात नियंत्रणात ठेवणं शक्य असतं. त्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल तर आतापासूनच स्विमिंग करायला सुरुवात करा. अनेक सेलिब्रिटीही स्वतःला मेन्टंड आणि फिट ठेवण्यासाठी स्विमिंगचा आधार घेतात. त्यामुळे तुम्हीही स्विमिंगचा आपल्या फिटनेस रूटिनमध्ये समावेश करा आणि नंतर बघा कमाल कसं तुमचं वजन लवकरच कमी होईल. 

स्विमिंगने कमी करा वजन 

- स्विमिंग एक कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज आहे. पाण्यामध्ये कमी वजन जाणवतं, त्यामुळेच एकत्रच पूर्ण शरीरावर काम करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर स्विमिंग करताना सांध्यांवर कोणताही दबाव येत नाही. 

- बटरफ्लाय स्विमिंग स्ट्रोक सर्वात कठिण असतो. परंतु, हे तेवढचं प्रभावी आहे. बटरफ्लाय स्ट्रोकमुळे अर्ध्या तासामध्ये जवळपास 450 कॅलरी बर्न करणं शक्य होतं. हा स्ट्रोक शरीराचा पोस्चर, लचीलापन, अप्पर बॉडी स्ट्रेंथमध्ये सुधारणा आणण्यासोबतच संपूर्ण बॉडि टोन करण्यासाठीही मदत होते. 

-  फ्रीस्टाइल स्ट्रोकही अत्यंत प्रभावित होतं. हे करणंही अत्यंक सोप आहे. हा स्ट्रोक कमजोर पाठ असणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे पाठीच्या स्नायूंसोबतच कंबरेचे स्नायू मजबुत करण्यासाठीही मदत करतं. 10 मिनिटांसाठी फ्रीस्टाइल स्ट्रोक केल्याने 100 कॅलरी बर्न होतात. 

- बॅकस्ट्रोक आणि ब्रेस्ट स्ट्रोक थोडासं वजन कमी करण्यासाठी मदत करतो. याचे इतरही अनेक फायदे आहेत. ब्रेस्ट स्ट्रोक हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे श्वासासंदर्भातील समस्या दूर होतात. बॅक स्ट्रोक मणक्यासाठी आणि कंबरेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 

या गोष्टी लक्षात ठेवा : 

स्विमिंग करा परंतु थोडी सावधानता बाळगा. स्विमिंग पूलमध्ये जाताना दोन तास अगोदर हेव्ही नाश्ता करू नका. स्विमिंग करताना तुम्हाला कॅम्प्स येत असतील तर त्वरित मदत घ्या. स्विमिंग पुलच्या पाण्यामध्ये क्लोरिन असतं. त्यामुळे पाण्यामध्ये जाण्याआधी आणि बाहेर आल्यानंतर आंघोळ करा. जिथेही स्विमिंग करत असाल तिथे एकतरी लाइफगार्ड असणं गरजेचं असतं. पाण्याची बाटली ठेवा आणि त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Swimming can help you to lose weight do these type of swimming to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.