ग्रीन टीनंतर आता रेड टीचे हे आरोग्यफायदे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 04:54 PM2018-06-25T16:54:24+5:302018-06-26T16:14:10+5:30

अलिकडे ग्रीन टी सारखीच पसंती रेड टीला सुद्धा मिळत आहे. ज्यांना ग्रीन टीची टेस्ट पसंत नाही ते रेड टीचा आस्वाद घेतात. चला जाणून घेऊया याचे फायदे आणि चहा करण्याची पध्दत....

Surprising health benefits of red tea | ग्रीन टीनंतर आता रेड टीचे हे आरोग्यफायदे जाणून घ्या!

ग्रीन टीनंतर आता रेड टीचे हे आरोग्यफायदे जाणून घ्या!

Next

ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत हे सर्वांनाच माहीत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला रेड टी म्हणजेच लाल चहाचे फायदे सांगणार आहोत. अलिकडे ग्रीन टी सारखीच पसंती रेड टीला सुद्धा मिळत आहे. ज्यांना ग्रीन टीची टेस्ट पसंत नाही ते रेड टीचा आस्वाद घेतात. चला जाणून घेऊया याचे फायदे आणि चहा करण्याची पध्दत....

रेड टी पिण्याचे फायदे

1) रेड टी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी निगडीत समस्यांचा सामनाही करावा लागत नाही.

2) रेड टीमध्ये असलेल्या अॅंटीऑक्सीडेंट तत्व हृदय निरोगी ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता कमी असते. 

3) असे सांगतात की, रोज रेड टीचं सेवन केल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशीही सामना करता येतो. 

4) या चहामुळे वाढतं वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते. 

रेड टी तयार करण्याची पद्धत

रेड टी तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी तीन कप डाळिंबांच्या बियांची गरज आहे. या बीया तुम्ही एक कप साखरेसोबत बारीक करुन घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. हे मिश्रण तुम्ही साठवूनही ठेवू शकता. त्यानंतर एक चतुर्थांश कप मिश्रण घ्या, त्यात गरम पाणी मिश्रित करा. तुम्हाला हवं असेल तर त्यात थोडं मधही घालू शकता. तुमचा चहा तयार...

रेड टीचे तोटे

रेड टीचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे आहेत. पण याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास याचा धोकाही होऊ शकतो. गर्भवती महिला किंवा बाळांना ब्रेस्टफिड करण्याऱ्या महिलांनी रेड टी घेऊ नये.
 

Web Title: Surprising health benefits of red tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.