Summer consumption intake! | उन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी!

उन्हाळा म्हटलं की विविध आजारांना आमंत्रण आलच. उन्हाळ्यातील दाहचा शरीरावर परिणाम होत अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात.वेळीच काळजी घेतली नाही तर आजार बळावतो, प्रसंगी रुग्णालयात दाखलही व्हावे लागते.असा प्रसंग आपणावर येऊ नये म्हणू वेळीच काळजी घेतलेली बरी. उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी आपण विविध शीतपेयांचे सेवन करतो, त्यापैकीच एक म्हणजे ताक होय.उन्हाळ्यात ताकाचे सेवन केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊया...!
 
* उन्हाळ्यात पचन क्रिया काही प्रमाणात बिघडते. त्यामुळे जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. 
 
* उन्हाळ्यात ताकाचे सेवन केल्यास वजनही नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.
 
* उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे. शिवाय सकाळ- संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
 
* वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ चूर्ण मिसळून सेवन केले पाहिजे.
 
* मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.
 
* सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेलं लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
 
* गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहºयावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात. 
 
* जर आपण अती ताण सहन करत असला तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णातही कमी होते.
 
* शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.
 
* खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावा. काही वेळाने स्नान करा. खाजेपासून मुक्ती मिळेल.
 
* विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम होतो. विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो. तरी डॉक्टराची सल्ला घेणे योग्य. 
 
* टाचा फाटल्यास ताक काढण्यावर निघणारं लोणी लावायला हवं.  

Web Title: Summer consumption intake!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.