'या' ड्रिंक्समुळे बिघडतं हृदयाचं आरोग्य, रिसर्चमध्ये करण्यात आला दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:24 AM2024-02-16T10:24:53+5:302024-02-16T10:25:18+5:30

या शोधात दावा करण्यात आला आहे की, स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये सामान्यपणे शुगर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे लगेच प्रभावासाठी ओळखले जातात.

Sugary drinks side effect on heart attacks claims Harvard study | 'या' ड्रिंक्समुळे बिघडतं हृदयाचं आरोग्य, रिसर्चमध्ये करण्यात आला दावा!

'या' ड्रिंक्समुळे बिघडतं हृदयाचं आरोग्य, रिसर्चमध्ये करण्यात आला दावा!

बरेच लोक एक्सरसाईज केल्यावर लगेच शुगर असलेले एनर्जी ड्रिंक्स घेतात. पण असं करणं तुमच्यासाठी फार नुकसानकारक ठरतं. एका शोधात सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही फिजिकल एक्सरसाईज दरम्यान गोड किंवा एनर्जी ड्रिंकचं सेवन करत असाल तर याने तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका होऊ शकतो.

Harvard T.H. Chan School of Public Health च्या या शोधात दावा करण्यात आला आहे की, स्पोर्ट्स ड्रिंकमध्ये सामान्यपणे शुगर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे लगेच प्रभावासाठी ओळखले जातात. काही खेळाडू यांचा वापर तेव्हाच करतात जेव्हा त्यांनी एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ हेवी वर्कआउट केला असेल. तर दुसऱ्यांसाठी हे केवळ जास्त कॅलरी असलेलं एक गोड पेय आहे. जे हेल्थसाठी फायदेशीर नाही.

आरोग्य बिघडवू शकतं हे Drinks

वैज्ञानिकांनी आपल्या या शोधासाठी जवळपास 100,000 वयस्कांना दोन गटात विभागलं आणि त्यांचं विश्लेषण केलं. यादरम्यान असं आढळलं की, जे लोक आठवड्यातून दोन वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा शुगर असलेल्या किंवा गोड पेयांचं सेवन करतात त्यांना फिजिकल एक्सरसाईज केल्यावरही हृदय रोगाचा धोका अधिक राहतो.

लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की, या शोधादरम्यान लोकांना आठवड्यातून केवळ दोनदा शुगर असलेलं Drinks देण्यात आलं होतं. तेव्हा ही बाब समोर आली. अशात विचार करा की, जे लोक रोज शुगर असलेले एनर्जी ड्रिंकचं सेवन करत असतील त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल.

नियमित एक्सरसाइज आणि चांगली डाएट दोन्ही हृदय हेल्दी ठेवण्यासाठी गरजेचं असतं. पण प्रश्न हा आहे की, शुगर हेल्थवर कसा प्रभाव टाकते.

एक्सपर्टनुसार, आपण जेवढी जास्त शुगर सेवन करतो. तेवढा जास्त हृदयासंबंधी समस्यांचा धोका वाढत जातो. जास्त शुगरमुळे वजनही वाढू लागतं. त्याशिवाय डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढतो. इंटरनेशनल मेडिसिन जर्नलनुसार, जे लोक दिवसभरात 17 ते 21 टक्के कॅलरीज इनटेक करतात, त्यांना फार लवकर हृदयासंबंधी समस्यांचा धोका असतो.

हेल्थ एक्सपर्ट्स कोल्ड डिंक्स, लिंबू पाणी, एनर्जी ड्रिंक, फळांचे कॉकटेल आणि पॅकेज्ड फळांच्या ज्यूसचं जास्त सेवन करणं टाळायला सांगतात. खासकरून वर्कआउट दरम्यान त्यांनी यापासून दूरच राहिलं पाहिजे. जिममध्ये स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाटी एनर्जी ड्रिंक्सच्या जागी इलेक्ट्रोलाइट युक्त पाणी सेवन करावं. त्याशिवाय तुम्ही नारळ पाणी, छासचं सेवन करू शकता.

Web Title: Sugary drinks side effect on heart attacks claims Harvard study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.