केळीच नाही तर केळीच्या मुळांचाही होतो आरोग्याला फायदा, जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 11:33 AM2019-02-01T11:33:09+5:302019-02-01T11:35:01+5:30

तुम्ही अनेकदा केळी खाण्याच्या फायद्यांबाबत वाचलं असेल. पण केळीच्या मुळाचे काय फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहेत का?

The root of banana is beneficial for health, Know its use | केळीच नाही तर केळीच्या मुळांचाही होतो आरोग्याला फायदा, जाणून घ्या कसा!

केळीच नाही तर केळीच्या मुळांचाही होतो आरोग्याला फायदा, जाणून घ्या कसा!

googlenewsNext

तुम्ही अनेकदा केळी खाण्याच्या फायद्यांबाबत वाचलं असेल. पण केळीच्या मुळाचे काय फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहेत का? केवळ केळीचेच नाही तर केळीच्या झाडाचेही इतर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खासकरून केळीच्या मुळाचे. याने अनेक प्रकारच्या आजारांपासून सुटका मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे...

पोषक तत्त्वांनी भरपूर केळीचं मूळ

केळीच्या मुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि खनिज असतात, जे इतर झाडांच्या तुलनेत फार जास्त असतात. यात सेरोटोनिन, टॅनिन, डोपामाइन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, नॉर-एपिनेफ्रिन आणि हायड्रोऑक्सिप्टामाइन इत्यादी पोषक तत्व असतात. याने आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात. 

केळीच्या मुळाचे फायदे

भरपूर पोषक तत्वांमुळे या मुळांच्या मदतीने वेगवेगळ्या समस्यांपासून सुटका मिळते. पण केळीच्या मुळांवर फार जास्त संशोधन करण्यात आलेलं नाही. मात्र असे मानले जाते की, केळीचे मूळ वेगवेगळ्या आजारांवर उपचार म्हणून वापरले जाऊ शकतात. ज्यात हेमेटुरिया, मूत्रासोबत रक्त येणे, मूत्राशयात संक्रमण या समस्यांचा समावेश आहे. यासोबतच आणखीही अनेक फायदे होतात. 

तापावर उपाय - केळीच्या मुळांमध्ये अ‍ॅंटीप्रेट्रिक गुण असतात, ज्याने शरीर थंड ठेवलं जातं. म्हणजे शरीराचं तापमान कमी करण्यास आणि ताप दूर करण्यास केळीच्या मुळाचा फायदा होतो. अ‍ॅंटीप्रेट्रिकमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि तापापासून सुटका मिळते. तसेच शरीरातील गरमी त्वचेच्या रोमछिद्रांमधून घामाच्या माध्यमातून बाहेर काढतात. 

सूज कमी करणे - आयुर्वेदीक उपचारांमध्ये केळीच्या मुळांचा वापर जुन्यातली जुनी सूज दूर करण्यासाठी केला जातो. हे फार विश्वसनिय आणि पारंपारिक औषध मानलं जातं. जर तुमच्या घशात सूज असेल तर उपचारासाठी तुम्ही केळीची मूळ चांगली स्वच्छ करून बारीक करा आणि तयार झालेली पेस्ट चांगल्याप्रकारे गाळून त्यातील रस काढून टाकावा. आता या केळीच्या मुळापासून तयार रसामध्ये थोडं पाणी मिश्रित करा आणि या पाण्याने गुरळा करा. असे ३ ते ४ दिवस केल्यास तुमची घशातील सूज कमी होण्यास मदत मिळते. 

अल्सरवर फायदेशीर - केळीच्या मुळाच्या मदतीने गॅस्ट्रिक अ‍ॅसिड तयार होण्यास रोखलं जातं. या अ‍ॅसिडमुळेच अल्सरची समस्या डोकं वर काढते. त्यामुळेच केळीच्या मुळांचा वापर आयुर्वेदात पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.  

डोकं शांत ठेवण्यासाठी - डोकं निरोगी ठेवण्यासाठी आणि डोक्यातील नसांची सूज दूर करण्यासाठी केळीच्या मुळांचा वापर केला जातो. डोक्यातील नसांवर सूज येणे घातक ठरू शकतं. ही समस्या दूर करण्यासाठी केळीच्या मुळांचा वापर करू शकता. 

उच्च रक्तदाबावर उपचार - जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल आणि यावर तुम्ही एखादा घरगुती उपाय शोधत असाल तर जास्त घाबरण्याची गरज नाही. तुम्ही ही समस्या केवळ केळीच्या मुळांनी दूर करू शकता. यासाठी ३० ते १२० ग्रॅम केळीची मूळ घ्या आणि स्वच्छ करून उकडा. केळीच्या मुळांचं हे उकडलेलं पाणी थंड होऊ द्या, त्यानंतर हे पाणी तुम्ही चहासारख सेवन करू शकता. याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील.

डोळ्यांसाठी फायदेशीर - डोळ्यांच्या आरोग्यासाठीही केळीच्या मूळांचा वापर करू शकता. कारण केळीच्या मुळांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात. म्हणजे केळीच्या मुळाचं सेवन करून शरीराची व्हिटॅमिन ए ची गरज पूर्ण केली जाऊ शकते. याने डोळ्यांना आणि शरीराला फायदा होतो. 

त्वचा रोगसंबंधी फायदे - त्वचासंबंधी समस्या दूर करण्यासाठीही केळीच्या मुळांचा वापर करता येतो. यासाठी यातील अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि अ‍ॅंटी-पायरेरिक गुण फायदेशीर ठरतात. हे गुण केळीच्या मुळात भरपूर प्रमाणात असतात. 

Web Title: The root of banana is beneficial for health, Know its use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.