डोळे लाल होतायत? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:30 PM2018-09-20T12:30:47+5:302018-09-20T12:32:56+5:30

डोळे लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या रूंदावणं असतं. असं तेव्हा होतं जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये एखादी गोष्ट जाते किंवा इन्फेक्शन होतं. डोळे काही वेळासाठी लाल होतात किंवा त्यांना इन्फेक्शन होतं.

reasons why your eyes become red ways to stay protected | डोळे लाल होतायत? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

डोळे लाल होतायत? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

googlenewsNext

डोळे लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या रूंदावणं असतं. असं तेव्हा होतं जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये एखादी गोष्ट जाते किंवा इन्फेक्शन होतं. डोळे काही वेळासाठी लाल होतात किंवा त्यांना इन्फेक्शन होतं. त्याचबरोबर डोळ्यांना वेदना होतात, खाज येते, डोळ्यांना सूज येते किंवा डोळ्यांमधून सतत पाणी येतं. डोळे लाल होणं म्हणजे डोळ्यांचा पांढरा भाग लाल होतो किंवा काही रक्तवाहिन्यांना सूज येऊन लाल होतात. जर तुम्हाला सतत हा त्रास होत असेल तर डॉक्टरंचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

लक्षणं -

  • डोळ्यांना खाज येणं
  • डोळ्यांमधून सतत पाणी येणं
  • उजेडाचा त्रास होणं
  • पुसटसर दिसणं
  • दृष्टी कमी होणं
  • एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये वेदना होणं.
  • टीव्ही पाहताना किंवा पुस्तक वाचताना त्रास होणं.

 

या कारणांमुळे लाल होतात डोळे -

  • कोरड्या पापण्या
  • माती किंवा धुळ
  • अॅलर्जी
  • सर्दी-खोकला
  • जास्त उन्हाचा त्रास होणं
  • बॅक्टेरिया

 

ही आहेत कारणं - 

- सतत कंप्यूटरवर काम केल्यामुळे आणि स्क्रीनकडे जास्त वेळ पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. 

- रक्त पातळ करण्याची औषधं घेणं. 

- डोळ्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या ड्रॉप्सचा जास्त वापर करणं. 

- सर्दी-खोकला

- धुम्रपान करणं

- झोप पूर्ण न होणं. 

या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

- डोळ्यांना दुखापत झाली असल्यास.

- डोळ्यांची दृष्टी कमी झाली असल्यास, उन्हामुळे जास्त त्रास होत, डोकदुखी यांसारख्या समस्या होत असल्यास. 

- डोळ्यांना होणाऱ्या वेदना.

- डोक्याल दुखापत झाली असल्यास 

- केमिकल्समुळे डोळ्यांना त्रास होत असल्यास

असा करू शकता बचाव - 

- डोळ्यांना त्रास होत असल्यास डोळे चोळू नका. असे केल्याने इन्फेक्शन आणि अॅलर्जी तयार करणारे बॅक्टेरिया पसरतात. 

- जोरात डोळे चोळल्याने डोळ्यांच्या कॉर्नियाला इजा पोहचू शकते आणि सबकन्जंक्टिवायटल हॅमरेज होऊ शकतं.

- ऊन, वाफ, माती आणि क्लोरिनसारख्या उत्तेजक पदार्थांपासून दूर रहा.

- कॉन्टॅक्ट लेन्सही सांभाळून वापरा. 

- कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ वापरू नका. झोपताना लेन्स अवश्य काढा.

Web Title: reasons why your eyes become red ways to stay protected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.