डायटिंगने वजन कमी करायचंय? त्याआधी बीएमआर काय आहे समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 11:04 AM2019-05-06T11:04:34+5:302019-05-06T11:10:31+5:30

वजन वाढलेल्या अनेकजणांचा असा समज असतो की, डायटिंग केल्याने वजन कमी होतं. पण याबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही असतात.

Not losing weight despite dieting? BMR could be a reason | डायटिंगने वजन कमी करायचंय? त्याआधी बीएमआर काय आहे समजून घ्या!

डायटिंगने वजन कमी करायचंय? त्याआधी बीएमआर काय आहे समजून घ्या!

googlenewsNext

(Image Credit : Thrive Global)

वजन वाढलेल्या अनेकजणांचा असा समज असतो की, डायटिंग केल्याने वजन कमी होतं. पण याबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. उठलं आणि डायटिंग सुरू केलं असं करून फायद्याऐवजी नुकसानच होतं. हे समजून घ्यायला पाहिजे की, आपण जे खातो त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. या ऊर्जेलाच कॅलरी म्हटलं जातं. ज्याने शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया सुरळीत चालतात. त्यामुळे आहार कोणत्याही परिस्थितीत सोडता येत नाही. कारण आहार हाच जीवनाचा आधार आहे. कॅलरी या मानवी शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आहे. जे शरीराच्या प्रक्रियांसाठी गरजेचं असतं आणि कॅलरी आहाराच्या माध्यमातून मिळतात. 

डायटिंगआधी हे महत्त्वाचं

(Image Credit : Medical News Today)

अनेकजण कुणीतरी कुणाच्यातरी सांगण्यावरून डायटिंगच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण डायटिंग सुरू करण्याआधी एखाद्या एक्सपर्ट किंवा डायटिशिअनचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं ठरतं. अनेकदा डायटिंगच्या दरम्यान शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता होते आणि डायटिंगचा प्रभाव उलटा होतो. याप्रकारच्या डायटिंगने वजन कमी होत नाही आणि नकळत तुम्ही घरबसल्या वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देता. त्यामुळे स्वत:च्या मनाने डायटिंग करू नका. 

बीएमआर रेटनुसार डाएट

(Image Credit : HealthGuide)

डायटिंग करायची असेल तर डायटिंगआधी बीएमआर म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट समजून घेणे महत्त्वाचे आहे. बीएमआर कॅलरी ते प्रमाण आहे ज्याची शरीराला गरज असते. तज्ज्ञ लोक बीएमआर रेट जाणून घेतल्यावरच तुम्हाला कोणत्याप्रकारची डाएट द्यायची हे ठरवतात. 

उपाशी राहिल्याने वजन वाढतं

(Image Credit : Live Science)

उपाशी राहून वजन कधीच कमी होत नाही. उलट उपाशी राहणे लठ्ठपणाचं कारण ठरतं. एक गोष्ट आणखी समजून घेणे गरजेचे आहे की, शरीरातील चरबी कमी करण्यासाठीही शरीरात कॅलरीची गरज असते. त्यामुळे डायटिंग तज्ज्ञांच्या देखरेखीतच झाली पाहिजे. 

कॅलरी गरजेच्या

(Image Credit : Mochi Magazine)

जर तुम्ही उपाशी रहाल तर तुमच्या शरीरात कॅलरी तयारच होणार नाहीत तर बर्न कशा होतील. त्यामुळे योग्य प्रमाणात अन्न खाणं आवश्यक असतं. जास्त किंवा विनाकारण खाणं टाळलं पाहिजे. कारण जास्त कॅलरी तुम्ही ग्रहण कराल तर त्या बर्न करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची डायटिंग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा ठरतो. 

(टिप : वरील लेखात सांगण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ माहितीसाठी आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फिटनेस प्रोग्रॅम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Web Title: Not losing weight despite dieting? BMR could be a reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.