सकारात्मक राहणाऱ्या महिलांना डायबिटीजचा धोका कमी - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 11:32 AM2019-01-26T11:32:36+5:302019-01-26T11:33:50+5:30

एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला असून ज्या महिला आशावादी असतात आणि नेहमी सकारात्मक विचारांसोबत जगतात त्यांना टाइप २ डायबिटीज होण्याचा धोका फार कमी असतो.

New study claims that positive women are at less risk of diabetes | सकारात्मक राहणाऱ्या महिलांना डायबिटीजचा धोका कमी - रिसर्च

सकारात्मक राहणाऱ्या महिलांना डायबिटीजचा धोका कमी - रिसर्च

Next

एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला असून ज्या महिला आशावादी असतात आणि नेहमी सकारात्मक विचारांसोबत जगतात त्यांना टाइप २ डायबिटीज होण्याचा धोका फार कमी असतो. मेनोपॉजनंतर महिलांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, सकारात्मक व्यक्तिमत्वाच्या महिलांना टाइप २ डायबिटीजचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते. 

Women Health Initiative WHI नावाच्या एका दिर्घकालिन अभ्यासाच्या आकडेवारी हा शोध आधारित आहे. 'मेनॉपॉज' या मॅगझिनमध्ये प्रकाशित या अभ्यासात १ लाख ३९ हजार ९२४ महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. आणि या महिलांना डायबिटीज आजार नव्हता. पण १४ वर्षांमध्ये टाइप २ डायबिटीजच्या १९ हजार २४० केसेस पाहिल्या गेल्या.

डायबिटीजचा कमी धोका

अभ्यासानुसार, जास्त आशावादी राहणाऱ्या महिलांची तुलना कमी आशावादी राहणाऱ्या महिलांशी केली गेली. नॉर्थ अमेरिकन मेनॉपॉज सोसायटीचे कार्यकारी निर्देशक जोअन पिंकर्टन यांनी सांगितले की, 'व्यक्तिमत्वाचे लक्षण आयुष्यभर स्थिर राहतात, त्यामुळे ज्या महिला कमी आशावादी आणि नकारात्मक विचार करतात त्यांना मधुमेहाचा धोका अधिक बघायला मिळाला'.

यानेही टाळता येतो डायबिटीज

तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत थोडा बदल केला तर तुम्ही जाडेपणासहीत आणखीही आजारांपासून बचाव करु शकता. ब्रिटनमधील एका विश्वविद्यालयात १० आठवडे केल्या गेलेल्या संशोधनादरम्यान काही लोकांचे दोन गट करण्यात आले होते आणि त्यांना सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेत ९० मिनिटांचा बदल करण्यास सांगण्यात आलं होतं. अभ्यासकांना या संशोधनात हे आढळून आलं की, वेळेवर जेवण केल्यास डायबिटीज, हृदय रोग, रक्तासंबंधी समस्या आणि शरीराच्या संरचनेत सकारात्मक बदल झाले. जर्नल ऑफ न्यूट्रीशन सायन्समध्ये प्रकाशित या संशोधनात असेल दिसले की, ज्यांनी वेळेवर जेवण केलं ते इतरांच्या तुलनेत दुप्पट वजन कमी करु शकले. 

भारतीय महिलांमध्ये डायबिटीजचं कारण

ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या एका अभ्यासानुसार, भारतीय महिलांमध्ये जाडेपणा आणि डायबिटीज होण्याचं कारण हे त्यांच्या व्हिटॅमिन डी ची कमतरता हे आहे. भारतीय महिलांवर करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, भारतातील ६८.६ टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. तर २६ टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डी फारच कमी आढळले आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, देशातील केवळ ५.५ टक्के महिलाच अशा आहेत, ज्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी चं प्रमाण आढळलं आहे. 

हा अभ्यास एम्स, डायबिटीज फाउंडेशन ऑफ इंडिया अॅन्ड नॅशनल डायबिटीज आणि ओेबेसिटी अॅन्ड कोलेस्ट्रॉल फाउंडेशनच्या अभ्यासकांनी मिळून केला. खरंतर जगभरातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक पब्लिक हेल्थ समस्या आहे. याचा थेट संबंध जाडेपणाशी आहे. या अभ्यासात केवळ महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. 

सूर्यकिरणांपासून दूर

या अभ्यासात सहभागी अभ्यासक सांगतात की, भारतातील जास्तीत जास्त महिला या घरात राहतात, हे त्यांच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याचं मुख्य कारण आहे. त्यांच्या कपडे परिधान करण्याच्या पद्धतींमुळेही सूर्य प्रकाशासोबत त्यांचां संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना सूर्य किरणांमधून मिळणारं व्हिटॅमिन डी त्यांना मिळू शकत नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की, उत्तर भारतातील महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता अधिक प्रमाणात बघायला मिळाली.

Web Title: New study claims that positive women are at less risk of diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.