पी.सी.ओ.एस.मुळे जडतात मानसिक विकार. वेळीच सावधान असलेलं बरं.

By Madhuri.pethkar | Published: November 9, 2017 06:39 PM2017-11-09T18:39:04+5:302017-11-09T18:41:58+5:30

पी. सी. ओ .एस. संदर्भातला एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास महिलांना या आजाराची गंभीर दखल घेण्यास सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे या आजाराचे काही नवीन परिणाम संशोधनातून सिध्द झाले आहे. हे परिणाम महिलांना त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास सूचित करत आहे.

Mental disorders due to PCOS Be careful at times! | पी.सी.ओ.एस.मुळे जडतात मानसिक विकार. वेळीच सावधान असलेलं बरं.

पी.सी.ओ.एस.मुळे जडतात मानसिक विकार. वेळीच सावधान असलेलं बरं.

ठळक मुद्दे* ज्या मुलींमध्ये, महिलांमध्ये पी.सी.ओ.एसची लक्षणं दिसतात त्यांनी लगेचंच या आजारावर औषधोपचार करायला हवेत. तसेच मानसोपचार तज्ञ्ज्ञांचा सल्लाही नियमितस्वरूपात घ्यायला हवा.* पी.सी.ओ.एस या आजाराशी सामना करता करताच जर मूल जन्माला आलं तर जन्माला येणा-या बाळाच्या मेंदू विकासावरही परिणाम होतो.

माधुरी पेठकर.


पी. सी. ओ .एस. पी.सी.ओ.डी. अर्थात पॉलिसिस्टीस ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टीस ओव्हरी डिसीज या संकल्पना आता सगळ्यांच्याच परिचयाच्या झाल्या आहेत. महिलांशी संदर्भात असलेला हा विकार, त्याचं स्वरूप आणि त्याचे परिणाम इतके व्यापक आहेत की त्यावर सतत अभ्यास होत असून त्या अभ्यासाचे निष्कर्ष नियमित प्रसारित होत असतात.

यासंदर्भातला एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास महिलांना या आजाराची गंभीर दखल घेण्यास सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे या आजाराचे काही नवीन परिणाम संशोधनातून सिध्द झाले आहे.
अभ्यासकांच्या मते पी.सी.ओ.एसमुळे मानसिक आजार, असंतुलन वाढतं. पी.सी.ओ.एस मुळे वंध्यत्व, अनियमित पाळी, शरीरावर अनावश्यक केस यासारखे परिणाम दिसतात. पी.सी.ओ.एस या आजाराशी सामना करता करताच जर मूल जन्माला आलं तर जन्माला येणा-या बाळाच्या मेंदू विकासावरही परिणाम होतो.

 

ज्या मुलींमध्ये, महिलांमध्ये पी.सी.ओ.एसची लक्षणं दिसतात त्यांनी लगेचंच या आजारावर औषधोपचार करायला हवेत. तसेच मानसोपचार तज्ञ्ज्ञांचा सल्लाही नियमितस्वरूपात घ्यायला हवा. जगभरात 5 ते 10 टक्के महिलांना हा पी.सी.ओ.एस. आजार जडला आहे. या आजारात महिलांच्या शरीरात पुरूषी संप्रेरकांचं प्रमाण वाढतं. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर होतो. पाळी अनियमित होवून चेहे -यावर आणि शरीरावर इतरत्र अनावश्यक केस, काळे डाग यांचं प्रमाण वाढतं.

 

 

आता तर यासंदर्भातल्या नवीन अभ्यासानं या विकाराचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होणा-या परिणामांवर प्रकाश टाकला आहे. तसेच गरोदरपणात महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम गर्भाच्या मेंदू विकासावर होतो आणि मुलांमध्ये आॅटिझम नावाचा विकारही विकसित होवू शकतो. या अभ्यासात पी.सो.ओ.एस.मुळे जगभरात 17000 महिलांना मानसिक असंतुलनाला तोंड द्यावं लागत आहे.
या अभ्यासात गेल्या सहा महिन्यापासून पी.सो.ओ.एस. च्या लक्षणांचा सामना कराव्या लागणा-या मुलींचा, महिलांचा समावेश केला गेला. या महिलांची तुलना ही लक्षणं नसलेल्या महिला मुलींशी केली असता पी.सी.ओ.एस.ची लक्षणं असलेल्या महिलांमध्ये मानसिक असंतुलन आढळून आलं आहे. या महिलांमध्ये भीतीग्रस्तता, विमनस्कता ( डिप्रेशन) आढळून आली.

पी.सो.ओ.एस.नं बाधित महिलांनी जन्म दिलेल्या बहुतांश मुलांमध्ये आॅटिझमची लक्षणं दिसून आलीत. अशा महिलांनी या पी.सी.ओ.एस.ची लक्षणं दिसल्याबरोबरच मानसिक असंतुलनावरही उपचार घ्यायला हवे होते असं अभ्यास सांगतो.

त्यामुळे पी.सी.ओ.एस. आहे म्हटल्यावर या विकारावर जसे औषधोपचार घ्यावे लागतात तसेच या आजारातून निर्माण होणा-या मानसिक आजारावरही आधीच उपचार घ्यायचे असतात. या विकाराशी असं दोन्ही पातळीवरून लढल्यास या विकाराच्या दुष्परिणामांची तीवता मोठ्या प्रमाणात कमी होते.

 

 

Web Title: Mental disorders due to PCOS Be careful at times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.