जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मायोनिज खाताय?; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 04:47 PM2019-05-17T16:47:58+5:302019-05-17T16:53:43+5:30

सध्या फक्त पॅकेज्ड फूड आणि जंक फूडमध्येच नाही तर घरी तयार करण्यात येणाऱ्या सॅन्डविच आणि बर्गरमध्येही लोक मायोनिज (mayonnaise) वापरतात.

Mayonnaise may also cause colorectal cancer says study | जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मायोनिज खाताय?; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मायोनिज खाताय?; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

Next

सध्या फक्त पॅकेज्ड फूड आणि जंक फूडमध्येच नाही तर घरी तयार करण्यात येणाऱ्या सॅन्डविच आणि बर्गरमध्येही लोक मायोनिज (mayonnaise) वापरतात. फक्त एवढचं नाही तर, मुलांना आवडतं म्हणून काही लोक पराठ्यासोबतही मायोनिज (mayonnaise) खाण्यासाठी देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मायोनिजचा पांढऱ्या रंग संरक्षित करण्यासाठी त्यामध्ये  फूड एडिटिव वापरण्यात येतं. पण हेच फूड एडिटिव कोलोरेक्टल कँसर (Colorectal Cancer) म्हणजेच मोठया आतडयाचा कर्करोग होऊ शकतो. एका रिपोर्टमधून संशोधकांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

(Image Credit : Serious Eats)

काय म्हणतो रिपोर्ट?

फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून सांगण्यात आले आहे की,  E171 फूड एडिटिवचा वापर करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्याला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच यामध्ये असलेल्या घातक तत्वांचा थेट आतड्यांवरही परिणाम होतो. परंतु याव्यतिरिक्त फूड एडिटिव्स आपल्या शरीरासाठी का घातक ठरतात? याबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही. 

(Image Credit : foodnetwork.com)

काय आहे फूड एडिटिव्स?

दरम्यान, खाद्य पदार्थांमध्ये रूप, रंग किंवा गंध यांसारखे कोणतेही गुणधर्म संरक्षित करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी याचा वापर करण्यात येणाऱ्या घटकाला फूड एडिटिव असं म्हटलं जातं. च्युइंग गम किंवा मायोनिज यांसारख्या पदार्थांमध्ये व्हाइटनिंग एजंटच्या स्वरूपात वापरण्यात येणारे फूड एडिटिव्समुळे पोटामध्ये जळजळ, पोटाच्या इतर समस्या आणि कोलोरेक्टल कँसरचा धोका असतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला आहे. 

(Image Credit : rembrandtfoods.com)

व्हाइटनिंग एजंट म्हणून वापर 

E171 ज्याला टाइटेनियम डाइऑक्साइड नॅनोपार्टिकल्स म्हणतात. हे एक फूड एडिटिव्स असून ज्याचा वापर व्हाइटनिंग एजंट म्हणून मोठ्या प्रमाणावर खाण्याच्या पदार्थामध्ये करण्यात येतो. फक्त पदार्थांमध्येच नाही तर औषधांमध्येही यांचा वापर करण्यात येतो. या फूड एडिटिव्सचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठी उंदरांवर एक संशोधन करण्यात आले. E171 चा वापर 900 पेक्षा जास्त फूड प्रॉडक्ट्समध्ये होत होता आणि आपल्यापैकी प्रत्येकजण दररोज मोठ्या प्रमाणावर या फूड एडिटिव्सचं सेवन करतात.
 
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Mayonnaise may also cause colorectal cancer says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.