एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 10:31 AM2018-12-15T10:31:48+5:302018-12-15T10:32:47+5:30

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे.

Loneliness can be the reason of premature death | एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा!

एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा!

Next

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे. म्हणजे तुम्हाला एकटेपणामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका ४० टक्क्यांनी वाढतो. हे आम्ही नाही तर एक रिसर्च सांगतोय. त्यासोबतच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आले आहे की, एकटेपणामुळे वेळेआधी मृत्यू म्हणजेच अकाली मृत्यू होण्याचा धोकाही ५० टक्क्यांनी वाढतो. 

डेनमार्क येथील कॉपेनहेगन युनिव्हर्सिटीच्या द हार्ट सेंटर हॉस्पिटलमधील अभ्यासक अॅने विनगार्ड क्रिस्टेनसेन यांनी यावर अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या २१८ रिसर्चचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी आरोग्यवर एकटेपणाचा होणारा प्रभाव याची माहिती मिळवली. यात त्यांना आढळले की, याचा फटका ४ मिनियन लोकांना बसतो आहे. तसेच या रिसर्चमधून हेही समोर आले आहे की, जे लोक आधीपासूनच हृदयरोगांनी ग्रस्त आहेत, त्यातील जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू हा एकटेपणामुळे झाला.

का होतं असं?

रिसर्चनुसार, जे लोक एकटेपणाचे शिकार असतात, त्यांना क्रॉनिक डिजीज होण्याचा धोका अधिक जास्त असतो. तसेच अशा लोकांमध्ये डिप्रेशनचा धोकाही अधिक जास्त असतो. 

रिसर्च सांगतो की, जे लोक समाजात राहूनही एकटे राहतात किंवा त्यांची इतर लोकांमध्ये उठ-बस कमी असल्याने कॉर्डियोवस्कुलर आजाराने ग्रस्त असतात, त्यांच्या मृत्यूचा धोका अधिक असतो. मित्र आणि परिवारात राहून लोक या आजारापासून बचाव करु शकतात.  

आणखीही काही कारणं

१) एकटेपणामुळे डिप्रेशनची शक्यता वाढते. जर तुम्ही एकटेपणाचे शिकार असाल, फार निराश असाल किंवा फार जास्त दुरावल्यासारखं वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे संकेत तुम्हासाठी पुढे फार हानिकारक ठरु शकतात. 
२) जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा त्यावेळी भविष्य आणि करिअरबाबत विचार करुन फार तणाव वाढतो. याने तुमच्या आरोग्यवरही वेगवेगळ्या दृष्टीने प्रभाव पडतो.

३) एकटेपणाचा प्रभाव तुमच्या डाएट आणि खाण्या-पिण्याच्या सवयींवरही पडतो. अशावेळी अनेकजण जंकफूड फार जास्त खातात आणि एक्सरसाइजही करत नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने हे फारच वाईट आहे आणि याचा परिणाम आपल्या शरीरावरही दिसू लागतो. 

काय करावे?

1) आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आणि मित्र परिवाराच्या संपर्कात रहा. तसेही एकटे राहत असताना नातं तयार करणं कठीण आहे. पण असं करुनच तुम्हाला फायदा मिळू शकतो. 

२) जेव्हाही एकटेपणा जाणवेल तर कुठे जाऊन कुणा तरी भेटा. याने तुम्हाला होणारा ताण कमी होईल.

३) नाती सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वेळ परिवारासोबत आणि मित्रांसोबत घालवण्याचा प्रयत्न करा. 

हेही ध्यानात ठेवा की, मनुष्य हा शारीरिक आणि मानसिक रुपाने समाजात राहण्यासाठी जन्माला आला आहे. एकटं राहणं हा आपला गुण नाही. पण जर तुम्ही एकटेपणाचे शिकार झाले असाल तर याचा अर्थ हा होतो की, निसर्गाने आपल्याला जसं बनवलं, तुम्ही त्याच्या विरोधात जाताय. 

Web Title: Loneliness can be the reason of premature death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.