Know about types and stages of breast cancer | जाणून घ्या; ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार आणि त्याच्या स्टेजस!
जाणून घ्या; ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार आणि त्याच्या स्टेजस!

भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा आजार वेगाने वाढत आहे. भारतामध्ये प्रत्येक आठपैकी एक महिला ब्रेस्ट कॅन्सरने पीडित आहे. एवढचं नाही तर ब्रेस्ट कॅन्सर अनेक महिलांच्या मृत्यूचं कारणंही बनला आहे. शरीरामधील कोणत्याही भागातील पेशींची असामान्य आणि अनियंत्रित वृद्धि झाल्याने कॅन्सर होतो. अशाचप्रकारे स्तनाचा कर्करोगही होतो. ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ब्रेस्टच्या आसपास गाठी तयार होतात. ज्यामुळे वेदना होऊ लागतात. अनेकदा अनियमित जीवनशैलीमुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त काही महिलांना आनुवांशिक कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं दिसून येतात. जर शरीरात होणारे बदल आणि ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं सुरुवातीपासूनच लक्षात घेतली तर औषधांनी हा आजार बरा करणं सहज शक्य आहे. 

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं :

- ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर स्तन किंवा काखेमध्ये सूज येते. 

- स्तनाच्या निप्पल्समधून पाणी किंवा रक्त येऊ लागते. 

- स्तनावर सूज किंवा लालसरपणा येतो.

- स्तनाच्या आकारातही फरक पडतो. जसं की, एकाचा आकार लहान तर एकाचा आकार मोठा दिसू लागतो. 

- स्तनावर काही पूरळ येतात तर अल्सर तयार होतात. जे अनेक उपचार केल्यानंतरही ठिक होत नाहीत. 

ब्रेस्ट कॅन्सरचे प्रकार :

1. इन्वेसिव डक्टल कार्सिनोमा ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार आहे. महिलांमध्ये आढळून येणारी 80 टक्के ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं ही इन्वेसिव डक्टल कार्सिनोमामुळे होतात. या प्रकारचा कॅन्सर डक्ट वॉलमार्फत ब्रेस्टच्या चरबी असणाऱ्या भागांपर्यंत पसरतो. ब्रेस्ट कॅन्सरचा हा प्रकार मिल्क डक्टस्मध्ये विकसित होतो.

2. इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार फार कमी आढळून येतो. या प्रकाराच्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करणं अत्यंत अवघड असतं. हे शरीरामध्ये अत्यंत वेगाने पसरतो. ज्यामुळे या प्रकाराने ग्रस्त असणाऱ्या महिलांच्या मृत्यूचा धोका अधिक वाढतो. इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचे रूग्ण एका टक्क्याहूनही कमी असतात. 

3. पेजेट्स डिजीज नावाचा ब्रेस्ट कॅन्सर निप्पलच्या आजूबाजूच्या भागात पसरतो. ज्यामुळे निप्पलच्या चारही बाजूंचा भाग काळ पडू लागतो. ज्या व्यक्तींना ब्रेस्टसंदर्भातील समस्यांचा आधीपासूनच सामना करावा लागत असतो त्यांना पेजेट्स डिजीज या प्रकारचा कॅन्सर होण्याती शक्यता वाढते. या समसयांमध्ये निप्पल्समध्ये इचिंग होणं, ब्रेस्टमध्ये वदना होणं, इन्फेक्शन होणं ही मुख्य कारणं आहेत. हा कॅन्सर 5 टक्क्यांपेक्षाही कमी असतो. 

4. महिलांमध्ये आढळून येणाऱ्या या ब्रेस्ट कॅन्सरव्यतिरिक्त ट्यूबुलर कार्सिनोमा, मेड्युलरी कार्सिनोमा, म्यूकस कार्सिनोमा, लोबुलर कार्सिनोमा यांसारख्या इतर प्रकारचेही ब्रेस्ट कॅन्सर आढळून येतात. 

ब्रेस्ट कॅन्सरच्या स्टेजेस :

स्टेज 0 

कॅन्सरच्या या स्टेजमध्ये ब्रेस्टमधील दूध तयार करणारे टिश्यू किंवा डक्टमध्येच कॅन्सरच्या पेशी असतील आणि शरीराच्या दुसऱ्या कोणत्याही भागात किंवा स्तनाच्या इतर भागातही नसतील पोहोचल्या तर हा स्टेज 0 कॅन्सर असतो. 

स्टेज 1 

स्टेज 1 मध्ये टिश्यूचा विस्तार होऊ लागतो आणि हे शरीरातील इतर निरोगी टिश्यूंनाही प्रभावित करू लागतात. हे ब्रेस्टचे फॅटी टिश्यूंपर्यंतही पसरू शकतात आणि ब्रेस्टच्या काही टिश्यूंच्या जवळ असलेल्या लिंफ नोडमध्येही पोहोचतात. 

स्टेज 2 

या स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर वाढून इतर भागांमध्ये पसरतो. असंदेखील होऊ शकतं की, कॅन्सरच्या पेशी पसरून इतर भागांमध्ये पसरल्या असतील. 

स्टेज 3

स्टेज 3 मध्ये कॅन्सर हाडांमध्ये किंवा इतर अवयवांमध्ये पसरलेला असतो. याव्यतिरिक्त काखेमध्ये किंवा आजूबाजूच्या भागांमध्ये 9 ते 10 लिंफ नोडमध्ये आणि कॉलर बोनमध्ये याचा काही भाग पसरलेला असू शकतो. त्यामुळे यावर उपचार करणं कठिण होतं. 

स्टेज 4 

स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सर लिव्हर, फुफ्फुसं, हाडं आणि मेंदूपर्यंतही कॅन्सर पोहोचतो. 

मॅमोग्राम करा :

महिलांना मॅमोग्राम टेस्ट करणं गरजेचं असतं. मॅमोग्राम केल्याने स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं दोन ते पाच वर्षांमध्ये समजणं शक्य होतं. ज्या महिलांना अशी शंका असेल की, त्यांना काही अनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यांनी तपासण्या करण्याआधी जेनेटिक काउंसिलरकडून सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टिप : वरील सर्व बाबी आम्ही वाचकांपर्यंत फक्त माहिती म्हणून पोहोचवतं आहोत. यातून आम्ही कोणत्याही गोष्टींचा दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवल्यास तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं असतं. 


Web Title: Know about types and stages of breast cancer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.