योग्य एअर प्युरिफायरची कशी निवड कराल? या गोष्टी ठेवा ध्यानात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 10:37 AM2018-09-08T10:37:50+5:302018-09-08T10:38:10+5:30

शहरांमधील हवा अलिकडे फारच प्रदूषित झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. जगातल्या सर्वात प्रदूषित २० शहरांपैकी १३ भारतातील आहे.

Keep these points in mind before buying an air purifier | योग्य एअर प्युरिफायरची कशी निवड कराल? या गोष्टी ठेवा ध्यानात!

योग्य एअर प्युरिफायरची कशी निवड कराल? या गोष्टी ठेवा ध्यानात!

googlenewsNext

(Image Credit : www.gizmochina.com)

शहरांमधील हवा अलिकडे फारच प्रदूषित झाल्याचे कुणीही नाकारणार नाही. जगातल्या सर्वात प्रदूषित २० शहरांपैकी १३ भारतातील आहे. अशात जर तुम्हाला वाटत असेल की, वायु प्रदूषण केवळ घराबाहेर आहे आणि घरात तुम्ही सुरक्षित आहात तर असे अजिबातच नाहीये. घरातील हवा सुद्धा अनेकदा प्रदूषित आणि हानिकारक होते. त्यामुळे घरातील हवा प्रदूषण मुक्त करण्यासाठी अनेकजण एअर प्युरिफायरचा वापर करु लागले आहेत. 

कशी कराल निवड?

१) प्युरिफायर अशा जागी सर्वात चांगलं काम करतं जिथे खिडकी आणि दरवाजे बंद राहतात. जेणेकरुन धूळ आणि माती फिल्टर केली जाऊ नये.

२) फिल्टर करण्याची क्षमता रुमच्या साइजसोबत मॅच करायला हवी. अशाच मॉडलची निवड करा जे रुम साइजपेक्षा जास्त एरियातील हवा स्वच्छ करण्यासाठी डिझाइन केलं गेलं आहे. 

३) प्युरिफायरमध्ये इन-बिल्ट ह्यामिडीफायर असणे गरजेचे आहे. 

४) एअर प्युरिफायरमध्ये कोणतं फिल्टर वापरलं गेलं आहे याचा अभ्यास करा. फिल्टरमध्ये पोलन, डस्ट, स्मोक, गंध आणि इतरही प्रदूषण पसरवणाऱ्या कणांना फिल्टर करण्याची क्षमता असावी. 

५) प्युरिफायर लावण्याची बेस्ट जागा तुमचं बेडरुम आहे आणि जर फरक दिसला तर तुम्ही वेगळ्या जागेवरही ते ठेवू शकता.

६) रुमच्या साइजच्या हिशोबाने प्युरिफायर तुमच्या रुमची हवा १५ ते ३० मिनिटात स्वच्छ करणार आणि त्यानंतरही त्याचा प्रभाव राहणार.

७) एअर प्युरिफायर खरेदी करताना अॅक्टिवेटेड कार्बन लेअर असलेल्या प्युरिफायरला प्राथमिकता द्यावी.

अशी करा प्युरिफायरची स्वच्छता

एअर प्युरिफायर हवेला फिल्टर करतं. आपण अनेक गोष्टींसाठी फिल्टर वापरत. आपण जे पाणी पितो त्यातही अनेक फिल्टर असतात. एअर प्युरिफायरचे फिल्टर फार सहजपणे चोक होऊ शकतात. त्यामुळे याला काही प्रमाणात व्हॅक्यून क्लीनरने साफ केलं जाऊ शकतं. 
 

Web Title: Keep these points in mind before buying an air purifier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.