जामनेरला तिघांचे अर्ज दाखल

By Admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:43+5:302017-01-31T02:06:43+5:30

भाजप, काँग्रेस आघाडीत उमेदवारीबाबत संभ्रम

Jamnare filed for three applications | जामनेरला तिघांचे अर्ज दाखल

जामनेरला तिघांचे अर्ज दाखल

googlenewsNext
जप, काँग्रेस आघाडीत उमेदवारीबाबत संभ्रम
जामनेर : जि.प.च्या पाळधी,लोढ्री गटासाठी एक व पं.स.च्या तोंडापूर व लोढ्री गणांसाठी प्रत्येकी एक असे तिन उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल झाले. भाजप, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे गुप्त ठेवली असून बुधवारी गट व गणातील उमेदवारांची यादी जाहीर करून त्याच वेळेस त्यांना पक्षाचा ए.बी. फार्म दिला जाईल असे सांगण्यात आले.
पाळधी-लोंढ्री गटातून सविता नाना पाटील, लोढ्री गणातून अलका गोपाल राजपूत व तोंडापूर गणातून जलाल सुलेमान तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
फत्तेपूर - तोंडापूर या गटातून भाजपने सरिवारी निवृत्त शाखा अभियंता जे.के. चव्हाण यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली. मात्र या वितीरिक्त सहा गट व पं.स.च्या १४ गणातील उमेदवारांची नावे आज दुपारपर्यंत देखील जाहीर झालेली नव्हती. इच्छुक उमेदवार दिवसभर मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात व पक्षाच्या तालुकाध्यक्षांशी संपर्क करताना दिसत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची यादी जवळपास निश्चित झाली असून बुधवारी त्यांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या समर्थंकांनी आज जैन यांची जळगावात भेट घेतली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरूद्ध निवडणूक न लढण्याचा पवित्रा समर्थंकांनी घेतला असल्याची माहिती शेतकरी संघाचे संचालक रमेश नाईक यांनी दिली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणार काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, जैन जो आदेश देतील त्यानुसार काम करू.

जालना येथून पायी दर्शन करून परतलेल्या मनोज चोरडिया यांच्या सत्कार
एका पायाने अपंग असूनही धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर
फत्तेपूर, ता. जामनेर : येथील अरिहंत फर्टिलायसरचे संचालक व भाजपाचे कार्यकर्ते मनोज चोरडिया हे जालना येथील प.पू. गुरूदेव सद्गुरूनाथ गणेशनाथजी म. सा. यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त जामनेर ते जालना पायी दर्शन करून परतल्यानंतर त्यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. चोरडिया एका पायने अपंग असून त्यांचा धार्मिक कार्यात सदैव पुढाकार असतो.
जामनेर येथील १२५ व फत्तेपूरातील ११ भाविक नुकतेच जालना येथून पायी दर्शन करून परतले यातील विनोद मदनलाल चोरडिया, प्रेरणा मनोज चोरडिया व विजया बेदमुथा यांनी तर पायी प्रवासा दरम्यान तिन दिवसांचे निरंकार उपवास देखील केले. जामनेर येथील जैन सोशल गृपचे सचिन चोपडा, शितल लोढा, मिंटू कोठारी, महावीर बागमार मुन्ना छाजेड, महावीर सिसोदिया यांनी यासाठी परिश्रम घेतले. सत्कार प्रसंगी यासीन पठाण, सलीम पटेल, शफीक पठाण, मुनीर कुरेशी, नरेंद्र बंब, मांगो इंगळे, शे. महमंद नसीर कुरेशी, नजीर कुरेशी, विकास कोचर, संदीप नेरीया, सुभाष फिरके, संदेश मंडलेचा आदि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Jamnare filed for three applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.