If you want to laugh, then domestic solutions | ​डोक्यात उवा असल्यास करा हे घरगुती उपाय

बिग बॉसच्या घरात नुकतीच प्रेक्षकांना ढिंचॅक पूजा पाहायला मिळाली होती. पूजा ही प्रेक्षकांची लाडकी असल्याने ती बिग बॉसच्या घरात जास्त दिवस टिकेल असे सगळ्यांना वाटले होते. पण ती नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. पूजा बिग बॉसच्या घरात असताना एका वेगळ्या गोष्टीची चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या आजवरच्या सगळ्या सिझनमध्ये ही गोष्ट पहिल्यांदाच घडली असल्याने या गोष्टीची सोशल मीडियावर देखील चर्चा झाली होती. ढिंचॅक पूजा ही तिच्या गाण्यांसाठी प्रचंड फेमस आहेत. युट्युबवरील तिची सगळीच गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आहेत. पूजाची लोकप्रियता पाहाता तिला यंदाच्या बिग बॉस सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली होती. पण पूजा घरात गेल्यानंतर काहीच तासात एका वेगळ्या चर्चेला उधाण आले.
पूजा घरात गेल्यानंतर सगळ्यांशी गप्पा मारत असताना हितेन तेजवानीला तिच्या डोक्यात उवा आणि लिखा असल्याचे लक्षात आले. त्याने ही गोष्ट लगेचच इतर स्पर्धकांना सांगितली. त्यावर सगळ्याच स्पर्धकांनी तिच्या केसांचे निरीक्षण केले. त्यावर तिच्या डोक्यात उवा असल्याचे सगळ्यांनाच दिसले. त्यावर हितेन तेजवानीने पूजासाठी बिग बॉसकडून उवा मारण्याचे औषध देखील मागितले. 
केसाची निगा न राखल्यास, आठवड्याला दोनदा तरी केस न धुतल्यास केसात उवा, लिखा होतात. डोक्यात उवा असल्यास चारचौघांमध्ये लाजल्यासारखे होते. अनकवेळा या गोष्टीमुळे तुमच्या अनुपस्थितीत तुम्ही इतरांच्या चर्चेचा विषय बनतात. त्यामुळे घरातल्या घरात हे उपाय केल्यास उवा नक्कीच निघून जातात. देवाच्या पूजेसाठी जो कापूर वापरला जातो, तो कापूर तेलात उकळून ते तेल थंड झाल्यावर केसाला लावून ठेवावे आणि सकाळी केस धुवावे. तसेच कांद्याच्या रसने केसाची एक तास मालिश करावी आणि केस धुऊन टाकावे. तसेच लसूण ठेचून त्याचा रस काढून घ्यावा आणि तो रस लिंबूच्या रसात मिसळावा. हा रस रात्रभर डोक्याला लावून ठेवावा आणि सकाळी केस एखाद्या साबणाने अथवा शॅम्पून स्वच्छ धुवावेत. अशाप्रकारे एक जरी उपाय आठवडयातून तीन-चार वेळा केले तर डोक्यातील सगळ्याच उवा, लिखा निघून जातील. 
Web Title: If you want to laugh, then domestic solutions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.