पायांवर दिसतं हृदयरोगाचं सुरूवातीचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:59 PM2024-03-19T14:59:23+5:302024-03-19T15:00:09+5:30

Common sign of heart failure : कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यावर वेगवेगळी लक्षण दिसतात. यातील एक म्हणजे पायांवर सूज येणे. पायांवर सूज येणं हा कंजेस्टिव हार्ट फेलिअरचा संकेत असू शकतो.

Heart Disease : Swelling feet ankles and lower legs is a common sign of heart failure | पायांवर दिसतं हृदयरोगाचं सुरूवातीचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

पायांवर दिसतं हृदयरोगाचं सुरूवातीचं लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

Sign Of Heart Problems: अलिकडे कमी वयातच बऱ्याच लोकांना हृदयरोगांच्या समस्या होत आहेत. हृदयरोगांमुळेच जगभरात जास्तीत जास्त लोकांचं मृत्यू होतो. याची कारणे वेगवेगळी असतात. यातील एक महत्वाचं कारण म्हणजे शरीरात वाढलेलं एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. शरीरात याची लेव्हल वाढली तर शरीरावर सूज येण्याची समस्या होते. कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यावर वेगवेगळी लक्षण दिसतात. यातील एक म्हणजे पायांवर सूज येणे. पायांवर सूज येणं हा कंजेस्टिव हार्ट फेलिअरचा संकेत असू शकतो.

कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण, कंजेस्टिव हार्ट फेलिअर एक गंभीर आजार असतो. या आजारात हृदयाला ब्लड पंप करण्यात अनेक समस्या येतात. ब्लड सर्कुलेशन जर योग्यपणे होत नसेल तेव्हा पायांमध्ये वॉटर रिटेशनची समस्या होते. ज्याकारणाने पायांवर सूज बघायला मिळते. पायांवर दिसणारी सूज म्हणजे हृदयरोगाचं सुरूवातीचं लक्षण असू शकतं. 

पायांवर सूज असेल तर वेळीच व्हा सावध

तुमच्या पायांवर विनाकारण अचानक सूज आली असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. असं केलं तर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. पायांवर, टाचांवर आणि पोटावर सूज आल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. या स्थितीत कंजेस्टिव हार्ट फेलिअरचे संकेत असू शकतो. पायांवर कुठेही सूज येण्याला पेरिफेरल एडिमा म्हटलं जातं. हा लोकांमध्ये हार्ट फेल होण्याचा सुरूवातीचा संकेत असू शकतो.

या समस्येमुळे पायांमध्ये जडपणा होऊ शकतो. सोबतच त्वचेवरही सूज दिसू शकते. काही निशाणही पडू शकतात. शूज घालण्यातही समस्या होऊ शकते. सूज आल्यामुळे पायांना गरमी लागते आणि ते कठोरही होऊ शकतात.

हृदयासंबंधी समस्या जास्त करून शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होतात. अशात गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पौष्टिक आहाराचा समावेश करा. रोज एक्सरसाइज करा. पायांवरील सूज कमी करण्यासाठी कमीत कमी मिठाचं सेवन करा. शरीरात जेव्हा सोडिअम वाढतं तेव्हा सूज येऊ शकते. 

काय काळजी घ्याल?

1) अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. पण त्यांना हे माहीत नसतं की, त्यांची ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा.

2) तसेच जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केटमधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात किंवा तूपात तयार केलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.

3) तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की हृदयासाठी लसूण चांगला असतो. ते खरंच आहे. लसूण हृदयासाठी चांगला असतो. कच्चा लसूण खाल्याने अधिक फायदा होतो. लसणाची एक कळी, आल्याचा एक तुकडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण रोज जेवणाआधी खाल्ल्याने जास्त फायदा होईल.

4) दालचीनीचा वापर करूनही तुम्ही कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण कमी करू शकता. एक चमचा दालचीनी आणि हर्बल त्रिकुटचा( काळे मिरे, लवंग आणि सूंठाचं चूर्ण) एक चतुर्थांश भाग टाकून चहा करा. चहा तयार केल्यावर 10 मिनिटे थंड होऊ द्या. नंतर यात एक चमचा मध मिश्रित करून दोनदा सेवन करा.

5) नियमितपणे रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होता. सोबतच कोलेस्ट्रॉलही कमी केला जातो. आवळ्याचा शरीरावर अ‍ॅंटी-हायपरलिपिडेमिक, अ‍ॅंटी-एथेरोजेनिक आणि हायरोलिपिडेमिक प्रभाव होतात. हे शरीरासाठी हायपोलिपिडेमिक एजंटसारखं काम करतात आणि याने सीरममधील लिपिडचं प्रमाणही कमी केलं जातं.

Web Title: Heart Disease : Swelling feet ankles and lower legs is a common sign of heart failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.