या 5 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यास हानिकारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 10:35 AM2018-06-20T10:35:59+5:302018-06-20T15:24:56+5:30

असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या पदार्थांमधील पोषक तत्वे कमी होतात. चला जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबाबत...

Health Tips : 5 foods that should always avoid to kept in the fridge | या 5 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यास हानिकारक!

या 5 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यास हानिकारक!

आजच्या धावपळीच्या दिवसात कुणाकडेही वेळ नाहीये. लोक स्वत:साठीही वेळ काढू शकत नाहीयेत. अशात लोक बाजारातून विकत घेतलेले किंवा रेडिमेड पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात. पण असे काही पदार्थ आहेत जे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या पदार्थांमधील पोषक तत्वे कमी होतात. चला जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबाबत...

1) ब्रेड

जास्तीत जास्त लोक फ्रिजमध्ये ब्रेड ठेवतात. पण ब्रेड ब्राऊन असो वा व्हाईट ते फ्रिजमध्ये कधीही ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्याने ब्रेडची टेस्ट तर बदलतेच शिवाय थंडीमुळे त्यात किटाणू सुद्धा होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.  

2) कॉफी

कॉफी तयार असो वा पावडरच्या स्वरुपात ती फ्रिजमध्ये ठेवू नये. याचं कारण म्हणजे कॉफी खूप लवकर दुसऱ्या पदार्थाचा स्वाद ओढून घेते. त्यामुळे कॉफीची टेस्टही बेकार होते. आणि त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. 

3) टोमॅटो

अनेकजण टोमॅटोही फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचं आवरण निघायला लागतं आणि त्यामुळे टोमॅटो लवकर बेकार होतात. हे टोमॅटो खाल्ल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतात. 

4) केळी

केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. खूप जास्त थंडीमुळे केळी काळी पडू लागतात. सोबतच केळीमधून इथायलीन गॅसही निघायला लागते. त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. 

5) मध

मध फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण मध आधीपासूनच प्रिझर्व केलेलं असतं. फ्रिजमध्ये ठेवल्याने अधिक घट्ट होतं. आणि त्यातील पोषक तत्वेही कमी होतात. 

Web Title: Health Tips : 5 foods that should always avoid to kept in the fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.