HEALTH : ​झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 07:22 AM2017-07-26T07:22:02+5:302017-07-26T12:52:02+5:30

आपणही कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र या पद्धतीने झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न आरोग्यासाठी घातक ठरु शकतो.

HEALTH: Can be in an effort to reduce weight immediately! | HEALTH : ​झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

HEALTH : ​झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

Next
ण नेहमी ऐकत असतो की, या सेलिब्रिटीने एवढ्या दिवसात वाढलेले वजन कमी केले. त्यात करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वाढलेले वजन कमी करणे, आमिर खानने ‘दंगल’साठी वाढवलेले वजन कमी करणे, भूमि पेडणेकरने चित्रपटासाठी वजन कमी करणे आदी बरीच उदाहरणे देता येतील. आपणही कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवून झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी बहुतांशजण क्रॅश डाएटचा पर्यायही निवडतात. मात्र या पद्धतीने झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न आरोग्यासाठी घातक ठरु शकतो.  

* क्रॅश डाएटवर असताना अनेकदा घटणारे वजन हे शरीरातील वॉटर वेट कमी करते. क्रॅश डाएटमुळे फॅट कमी होतीलच असे नाही. सोबतच शरीराला आवश्यक असणारे पाणीदेखील न मिळाल्याने अनेक समस्या वाढू शकतात. डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता यामुळेही डीहायड्रेशनचा त्रास वाढतो. वेळीच डीहायड्रेशनच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास किडनीच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात.  

* क्रॅश डाएटवर असणाऱ्या लोकांच्या शरीरात सोडीयमची पातळी कमी होते. त्यामुळे थकवा जाणवून गरगरल्यासारखे होते. शिवाय यामुळे शरीरात इलेक्ट्रोलेट बॅलन्सची पातळी कमी जास्त होऊ शकते. याचा परिणाम कार्डियोव्हसक्युलर फंशनवर होतो.

*  क्रॅश डाएटमुळे जसे हृद्याचे आरोग्य धोक्यात येते तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचीदेखील कमतरता निर्माण होते. शरीरात मुबलक आयर्न नसल्यास अ‍ॅनिमियाचा त्रास बळावू शकतो तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे आॅस्टोपोरायसिसचा त्रास वाढतो.

* शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीजपेक्षा कमी डाएट घेतल्यास उपासमार होते. यामुळे शरीरात एनर्जी साचवून ठेवली जाते. त्याचा परिणाम मेटॅबॉलिझमवरही होतो. शरीराला पुरेसे प्रोटीन,न मिळाल्यास स्नायू कमजोर होतात. यामुळेदेखील शरीराचा मेटॅबॉलिझम रेटही कमी होतो.   

* लहान सहान गोष्टी असतील तर शरीर त्यानुसार स्वत:मध्ये बदल करते. मात्र अचानक आणि मोठे बदल झाल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. अचानक अन्न घेण्याकहे प्रमाण कमी झाल्यास, शरीराचे चक्र बिघडते. 

Also Read : ​​Health : जापानी सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी वापरतात ‘हा’ खास फार्मुला !
                   : ​Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !

Web Title: HEALTH: Can be in an effort to reduce weight immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.