कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते सदाफुली - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 11:22 AM2018-11-11T11:22:36+5:302018-11-11T11:23:56+5:30

बागेत किंवा एखाद्या मोकळ्या जागी फिरताना सहज नेहमी फुलांनी बहरलेलं झाडं आपल्या सर्वांच्या नजरेस पडतं, ते म्हणजे सदाफुली. या झाडावर कधीही पाहिलतं तरीदेखील गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांचा झुपका दिसतो.

health benefits of periwinkle flower evergreen shrub may be source of new cancer diagnostic agent | कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते सदाफुली - रिसर्च 

कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते सदाफुली - रिसर्च 

googlenewsNext

बागेत किंवा एखाद्या मोकळ्या जागी फिरताना सहज नेहमी फुलांनी बहरलेलं झाडं आपल्या सर्वांच्या नजरेस पडतं, ते म्हणजे सदाफुली. या झाडावर कधीही पाहिलतं तरीदेखील गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांचा झुपका दिसतो. या फुलांना सुगंध जरी नसला तरीदेखील सदाबहरलेली ही फुलं पाहून काही वेळासाठी का होईना मन प्रसन्न होतं. याव्यतिरिक्त ही फुलं आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. 

सदाफुलीच्या फुलांमध्ये  विन्डोलिन (vindolin) नावाचं एक तत्व आढळून येतं. जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त यामध्ये विनब्लास्टिन (vinblastine) आणि विनक्रिस्टिन (vincristine) यांसारखी तत्वदेखील आढळून येतात. जे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. एका नवीन संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, या झाडामध्ये काही अशी तत्व आढळून येतात जी कॅन्सरच्या पेशी ओळखून त्या नष्ट करण्याचे काम करतात. 

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी), रूरकीमधील संशोधकांनी कॅन्सरच्या पेशी ओळखून त्या नष्ट करण्यासाठी 'फ्लूरोसेंट कार्बन नॅनोडॉट्स' नावाचं एक रसायन तयार केलं आहे. नॅनो कार्बन नावाचं हे तत्व सदाफुलीच्या झाडाच्या पानांपासून तयार केलं आहे. या झाडाचे आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर उपचार म्हणून महत्व सांगितले आहे. डायबिटीज, मलेरिया आणि होडकिन लिम्फोमावर उपचार म्हणून पारंपारिक चीनी औषधांमध्ये याच्या रसाचा वापर करण्यात येतो. 

संशोधक पी. गोपीनाथ यांनी सांगितले की, 'ही प्रणाली कॅन्सरवर वापरण्यात येणाऱ्या प्रणालीपैकी नवी प्रणाली आहे. या नॅनो पदार्थांमार्फत इमेजिंग प्रणालीमुळे कॅन्सरच्या पेशीं ओळखण्यास आपल्याला मदत होईल. तसेच त्याचवेळी त्या नष्ट करण्यासही मदत होईल.'

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, कॅन्सरच्या पेशींची ओळख आणि त्यावर उपचार करण्याची पद्धत यांचा अभ्यास करण्यासाठी या नॅनो पदार्थांचा जंतुंवर अभ्यास करण्यात येणार आहे. आयआयटीच्या टीमच्या या संशोधनाला सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड (सर्ब) आणि जैव प्रौद्योगिकी विभाग, केंद्रीय  विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालयानेही मदत केली आहे. 

सदाफुलीच्या पानांचे इतर फायदे :

1. हायपरटेंशनवर गुणकारी 

जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर ही छोटी फुलं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यामुळे तुमचं ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होईल. त्यासाठी तुम्हाला 6 ते 7 फुलांच्या पाकळ्या एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा. रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी पिणं फायदेशीर ठरेल. 

2. डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी

फुलांच्या 15 ते 16 पाकळ्या घ्या आणि तीन कप पाण्यामध्ये उकळा. हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या. यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. 

3. किडनी स्टोनवर रामबाण इलाज

साधारणतः एक मुठभर पानं घ्या आणि स्वच्छ धुवून तीन कप पाण्यामध्ये उकळून घ्या. व्यवस्थित उकळल्यानंतर दिवसातून दोन वेळा या पाण्याचे सेवन करा. 

या गोष्टी लक्षात ठेवा :

जर तुम्ही कॅन्सर पीडित असाल तर तुम्ही या थेट या पानांचं सेवन करू शकतं नाही. कारण संशोधकांनी अभ्यास करून याचा वापर त्यावर काही प्रयोग केल्यानंतरच केला आहे. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी थेट याच्या पानांचं सेवन केलं तर ते नुकसानदायकही ठरू शकतं. 

Web Title: health benefits of periwinkle flower evergreen shrub may be source of new cancer diagnostic agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.