पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं हे खास पाणी, लगेच पिणं करा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:11 PM2024-04-26T13:11:59+5:302024-04-26T13:13:58+5:30

एक्सपर्ट सांगतात की, बडीशेपचं पाणी नियमित प्यायल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्याही दूर होते.

Health benefits of fennel water for stomach | पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं हे खास पाणी, लगेच पिणं करा सुरू!

पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं हे खास पाणी, लगेच पिणं करा सुरू!

बडीशेप मुखवास म्हणून लोक नेहमीच खातात. रोज लोक बडीशेप खातात, पण त्यांना याचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतात. सामान्यपणे जेवण केल्यावर लोक बडीशेप खातात. कारण हे सगळ्यांना माहीत आहे की, याने तोंडाला चांगली चव येण्यासोबत अन्न पचन होण्यास मदतही मिळते. बडीशेपमध्ये एनीसोल नावाचं एंटीऑक्सिडेंट असतं ज्यामुळे पचनास मदत मिळते.

एक्सपर्टनुसार, बडीशेपचं पाणी नियमित प्यायल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्याही दूर होते. कारण यात आढळणारे तत्व गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. यासोबतच बडीशेपचं इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याने वजन कमी करण्यास, तोंडाची दुर्गंधी घालवण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ इतरही फायदे.

डायजेशनमध्ये मदत

बडीशेपचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगलं होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठीही बडीशेपचं पाणी फायदेशीर मानलं आहे. याने गॅस, अ‍ॅसिडिटीही दूर होते.

वजन कमी करण्यास मदत

बडीशेपचं पाणी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. कारण यात कॅलरी कमी असतात. तसेच याने सतत खाण्याची क्रेविंगही कंट्रोल करता येते.

अ‍ॅंटीऑक्सिडेंट 

बडीशेपमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे आपल्या कोशिकांचं रक्षण करतात. तसेच अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे तुमची त्वचा तरूण दिसते. यासोबतच याने अनेक आजारांपासूनही बचाव होतो.

कसं तयार कराल बडीशेपचं पाणी?

बडीशेपचं पाणी बनवण्यासाठी 1 मोठा चमचा बडीशेप आणि 1 कप पाणी घ्या. रात्रभर बडीशेप पाण्यात टाकून ठेवा. नंतर सकाळी 5 मिनिटे हे उकडून घ्या आणि हलकं थंड झाल्यावर याचं सेवन करावं.

Web Title: Health benefits of fennel water for stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.