Fresh Juices Stay Fresh in the Summer | उन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश

उन्हाळ्यात बाहेर फिरल्यास उन्हाचा परिणाम शरीरावर होऊन काही प्रमाणात थकवा जाणवतो.अशावेळी थकवा घालविण्यासाठी आपण काहीतरी शीतपेय घेतो. मात्र फ्रूट ज्यूस सेवन केल्यास तत्काळ अ‍ॅनर्जी तर मिळेलच शिवाय फ्रेशदेखील वाटेल.चला तर मग घरीच फ्रू ट ज्यूस कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊया. 

* मॅँगो शेक
साहित्य : आंबा, दूध, साखर.
कृती : एक ग्लास दूध, एका आंब्याचा फोडी व चवीपुरती साखर मिक्सरमध्ये घुसळून घ्यावे. हवा असल्यास घुसळतानाच बर्फ घालावा. फार गार नको असल्यास बर्फ नंतर घालावा. मिक्सरमध्ये शेक चांगला होतो. मिक्सर नसेल तर अंडी फेसण्याच्या रवीने घुसळावे. दूध व आंबे एकजीव झाल्यामुळे आणि फेसामुळे शेक लज्जतदार लागतो.

* आॅरेंज अपीटायझर
साहित्य :सहा संत्री, अर्धा चमचा आल्याचा किस, सहा ते आठ पुदिन्याची पाने, एक टेबलस्पून मध, एक लिंबाचा रस, एक चमचा सैंधव मीठ, तीन ते चार बर्फाचे छोटे क्यूब.

कृती : सर्वप्रथम संत्र्याचा रस काढून तो गाळून घेणे. नंतर त्यात आलं, पुदिन्याची पाने, मध, लिंबाचा रस, पिंक संचर, बर्फ घालून हॅन्डमिक्सरने चर्न करणे. हे मिश्रण गाळून ग्लासमध्ये ओतून थंडगार सर्व्ह करावे. उन्हातून आल्यावर किंवा जेवणापूर्वी हे प्यावे. 

* ड्राय फू्रट्स मॅँगो लस्सी
साहित्य: एकप दही, तीन चमचे साखर, एक आंबा, पात बदाम, दोन-तीन ड्राप रोज वाटर, पिस्ते, बर्फाचे तुकडे

कृती: आंब्याचे साले काढून लहान तुकडे कापून घ्या. बदाम आणि पिसते मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये दही, आंबाच्या फोडी, पाणी, साखर टाकून पिसून घ्या. रोज वाटर मिसळा. अता हे मिश्रण गाळून घ्या. अता एका ग्लासात बफार्चे तुकडे टाकून त्यात लस्सी आणि वरून ड्राय फ्रूट्स पावडर टाकून सर्व्ह करा.

Web Title: Fresh Juices Stay Fresh in the Summer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.