डाएटमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये होत आहेत बदल - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 10:56 AM2019-04-21T10:56:28+5:302019-04-21T10:57:05+5:30

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सध्या आपण आहारात जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूडचा समावेश करत आहोत. त्यामुळे आपला चेहरा लहान होत आहे.

Food habits changing our looks says study | डाएटमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये होत आहेत बदल - रिसर्च 

डाएटमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये होत आहेत बदल - रिसर्च 

googlenewsNext

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सध्या आपण आहारात जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूडचा समावेश करत आहोत. त्यामुळे आपला चेहरा लहान होत आहे. आर्कियॉलॉजिस्टच्या एका इंटरनॅशनल टिमने ह्यूमन फेसचं इवॉल्यूशन केलं, ज्यामध्ये 100,000 वर्षांमध्ये हळूहळू चेहरा बारिक होत असल्याचे समोर आले. 

(Image Credit : Naked Security - Sophos)

निएंडरथल मानव आणि माकडांचं कपाळ मोठ आणि थोडंसं भरीव असायचं. त्याचबरोबर त्यांचा चेहरा रूंद आणि दात मोठे होते. मानवाने जेव्हा अन्न शिजवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून मानवाचा चेहरा आधीपेक्षा बारिक होण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की, आपल्याला अधिक शक्ती असणारा जबडा आणि दातांची गरज कमी भासू लागली. 

यॉर्क आणि हॉल यूनिवर्सिटीज जुन्या आफ्रिकी मानवांच्या चेहऱ्यापासून ते मॉर्डन चेहऱ्यांपर्यंत सर्व टप्प्यांवर चेहऱ्यांमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. यॉर्क यूनिवर्सिटीचे प्रोफेसर पॉल यांनी सांगितले की, 'मानवाच्या सध्याच्या आहारामध्ये असणाऱ्या सॉफ्ट डाएटमुळे मानवाचा चेहरा हळूहळू लहान होत आहे.' तसेच मानवाचा चेहरा कितपत बदलू शकतो याचंही एक लिमिट आहे. परंतु श्वास घेण्यासाठई मोठ्या नेजल खॅविटीची गरज असते. 

वैज्ञानिकांच्या मते, मानवाच्या चेहऱ्याचा विकास होण्यामागी आणखी एक कारण म्हणजे, आपण आपल्या आयब्रोजनी जास्तीत जास्त एक्सप्रेशन्स देऊ शकतो. मानवाची जशी जशी उत्क्रांती झाली आणि तो शिकाऱ्यापासून शेतकरी झाला. तसेच शेतीच्या माध्यामातून मका आणि गव्हाचं पिक घेऊन चपाती तयार करू लागले. तसतसा आपला चेहरा लहान होत गेला.
 
प्रोफेसर पॉल असं सांगतात की, 'आम्हाला हे माहीत आहे की, डाएट, श्वास घेण्याची प्रक्रिय आणि वातवरणात होणाऱ्या बदलांमुळे मनुष्याचा चेहरा असा झाला आहे. परंतु, याच्याच आधारावर विकासाची व्याख्या तयार करणं योग्य नाही.' आपण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमार्फत 20 प्रकारचे इमोशन्स जाहिर करू शकतो. आपला पूर्वज असलेला मानव असं करण्यासाठी सक्षम नव्हते. त्यांच्या चेहऱ्याचा आकार आणि स्नायूंची जागा वेगळी होती. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. 

Web Title: Food habits changing our looks says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.