FITNESS : ​पावसाळ्यात फिटनेससाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 08:00 AM2017-07-25T08:00:19+5:302017-07-25T13:30:19+5:30

फिटनेससाठी कोणत्या ऋतूत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे बऱ्याचजणांना माहित नसते. त्यामुळे फायद्या ऐवजी नुकसानच होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

FITNESS: There are 'these' things important for the rainy season! | FITNESS : ​पावसाळ्यात फिटनेससाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

FITNESS : ​पावसाळ्यात फिटनेससाठी ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

Next
लिब्रिटी आणि फिटनेस जणू समिकरणच झालं आहे. फिटनेससाठी प्रत्येक सेलिब्रिटी आग्रही असतो. विशेष म्हणजे फिटनेस त्यांच्या लाइफस्टाइलचा एक भागच झाला आहे. त्यांचेच अनुकरण करुन आजची तरुणाईदेखील फिटनेस टिकविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र बऱ्याचदा फिटनेससाठी प्रयत्न करुनही अपेक्षित फायदा होत नाही. काही तज्ज्ञांच्या मते, ऋतूमानानुसार फिटनेसाठीच्या पद्धतीत बदल असणे आवश्यक आहे. मात्र फिटनेससाठी कोणत्या ऋतूत कशा प्रकारे काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे बऱ्याचजणांना माहित नसते. त्यामुळे फायद्या ऐवजी नुकसानच होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

आजच्या सदरात आम्ही आपणास पावसाळ्यात फिटनेससाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याबाबत सांगणार आहोत. 

फिटनेससाठी प्रतिबद्धता आणि समर्पण खूपच महत्त्वाचे असते. यासाठी पावसाळ्यातदेखील फिटनेससाठी तेवढेच आग्रही असावे. तज्ज्ञांच्या मते, घराच्या आतदेखील आपण नॉर्मल वर्कआउट करून स्वत:ला फिट ठेवू शकतो. मात्र आपले शरीर जलप्रतिरोधी असल्याने आऊट डोअर रनिंगदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. घराबाहेर जाऊन व्यायाम केल्याने आपले मेटाबॉलिज्म सक्रिय होतो आणि आपणास भरपूर ऊर्जा मिळून आपण फिट होतो. 
   
मात्र आपणास पावसाळ्यात बाहेर जाऊन व्यायाम करायचा नसेल तर घरात स्क्वॅट, पुशअप, प्लांक यासारखे व्यायाम प्रकार ३० ते ४० मिनिटांपर्यंत करु शकता. त्यात स्ट्रेचिंग, नंतर पाच मिनिट स्पॉट जॉगिंग, पंधरा मिनिट कार्डियो करु शकता. यामुळे ह्रदयाची स्पंदने वेगाने वाढतील आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होईल. याशिवाय दोरी उड्या, पायऱ्यांचा चढ-उतार, जागेवरच्या उड्या आदी व्यायाम करू शकता. यामुळे शरीराच्या मांसपेशी तर मजबूत  होतातच शिवाय सांधेदेखील स्ट्रॉंग होतात. आपण या ऋतूत योगा करूनही फिट राहू शकता. तसेच डान्स वर्क आऊटचाही प्रयोग करु शकता.

व्यायामादरम्यान योग्य कपडे, शूज आणि एसेसरीजचा वापर करणेदेखील आवश्यक आहे.  या दिवसात शरीराला विटॅमिन्सची आवश्यकता भासते. म्हणून व्यायामाबरोबरच ऋतूनुसार उपलब्ध असणारे विटॅमिनयुक्त फळे आणि भाजीपालांचेही सेवन करावे. यामुळे शरीरास ऊर्जा मिळून संक्रमणापासून बचाव होतो.

Also Read : HEALTH : पावसाळ्यात वर्क आऊट करताना कशा प्रकारचे कपडे वापराल?        

Web Title: FITNESS: There are 'these' things important for the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.