Fitness: If you want a body similar to CATRINA CAFF 'Towel Exercise'! | ​Fitness : कॅटरिना कैफसारखी बॉडी हवी असल्यास करा ‘टॉवेल एक्झरसाइज’!

बॉलिवूडचे प्रत्येक सेलेब्स आपल्या फिटनेससाठी खूप मेहनत घेताना दिसतात. विशेष म्हणजे ते स्वत: फिटनेससाठी काळजी तर घेतात शिवाय आपल्या फॅन्सलादेखील फिट राहण्यासाठी सोशल मीडियाद्वारे काही महत्त्वपूर्ण टिप्स देतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ होय. कॅटरिनाचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती टॉवेल एक्झरसाइज करताना दिसत आहे. 

आशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून प्रसिद्ध कॅटरिना कैफ आपल्या लवचिक शरीर आणि डान्स मूव्हज्साठी ओळखली जाते. शिवाय ती बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्रींमधूनही एक आहे. आपला असा एक गैरसमज आहे की, फिटनेससाठी मोठमोठ्या उपकरणांची आवश्यकता असते. मात्र कॅटरिना कैफनुसार फक्त एक साधारण टॉवेलद्वारा आपण आपल्या कंबरेला सुडौल बनवून आपले शरीर फिट बनवू शकतो. वर्कआउटदरम्यान जर आपणास वजन उचलणे पसंत नसेल आपणास टॉवेल एक्झरसाइज नक्कीच आवडेल. टॉवेल एक्झरसाइज करतानाचा व्हिडिओ कॅटरिनाची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  

या व्हिडिओमध्ये दोघेही आपल्या टॉवेलच्या मदतीने एक्झरसाइज करताना दिसत आहेत. या एक्झरसाइजद्वारे आपल्या शरीराचा वरचा भाग आणि छातीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. याशिवाय कमरेखाली भागदेखील स्ट्रॉँग होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे हा एक्झरसाइज करणे अतिशय सोपे असून आपण घरीदेखील सहज करू शकता. यासाठी आपणास फक्त एका टॉवेलची आवश्यकता आहे.  

कॅटरिनासारखी बॉडी हवी असल्यास हा टॉवेल एक्झरसाइज तर कराच शिवाय तिचा डायट प्लॅनही फॉलो करून फायदा मिळू शकतो. कॅटरिनाच्या फिट राहण्यासाठी लीन मीट, स्वच्छ आणि हिरव्या भाजीपाला आदींचा समावेश आवर्जून करते. शिवाय ती शरीरात मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी दर दोन तासांनी काहीनाकाही सेवन करीत असते. शरीरात चरबी वाढू नये म्हणून कॅटरिना खूप काळजी घेते. यासाठी तेलकट पदार्थ तसेच सॅचुरेटेडे फॅटयुक्त पदार्थ अजिबात सेवन करत नाही. तिला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते तेव्हा साखरेच्या पदार्थांऐवजी गुळ किंवा मधयुक्त पौष्टिक पदार्थांचे सेवन करते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती भरपूर पाण्याचे सेवन करते.       
 

Web Title: Fitness: If you want a body similar to CATRINA CAFF 'Towel Exercise'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.