तुम्ही 'वजनदार' असाल तर 'या' खास फिटनेस टिप्स फक्त तुमच्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 01:30 PM2019-04-27T13:30:42+5:302019-04-27T13:33:55+5:30

ज्या महिलांचं वजन जास्त असतं, त्यांनी आपल्या हेल्थ आणि फिटनेसची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुमची कंबर आणि मांड्यांचा भाग जास्त जाड असेल तर तुम्हाला अगदी काटेकोरपणे फिटनेस रूटिन आणि डाएट फॉलो करणं गरजेचं असतं.

Fat or heavy body type women take care of your fitness by following these tips | तुम्ही 'वजनदार' असाल तर 'या' खास फिटनेस टिप्स फक्त तुमच्यासाठी

तुम्ही 'वजनदार' असाल तर 'या' खास फिटनेस टिप्स फक्त तुमच्यासाठी

googlenewsNext

ज्या महिलांचं वजन जास्त असतं, त्यांनी आपल्या हेल्थ आणि फिटनेसची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुमची कंबर आणि मांड्यांचा भाग जास्त जाड असेल तर तुम्हाला अगदी काटेकोरपणे फिटनेस रूटिन आणि डाएट फॉलो करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुमच्या पचनक्रियेचं कार्य फॅट एकत्र करण्यासोबतच फॅट्स नष्ट करण्यासाठी काम करणं गरजेचं असतं. अशातच तुम्ही दररोज एका तासासाठी नियमितपणे एक्सरसाइज करणं आवश्यक असतं. अशातच महिलांसाठी एक त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार केलेला वर्कआउट प्लॅन किंवा रोटेशनल डाएट प्लॅन असणं अत्यंत फायदेशीर ठरतो. 

योगाभ्यास 

योगाभ्यास शरीराचं अतिरिक्त वजन आणि चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. तुम्ही धनुरासन, नौकासन, भुजंगासन, पवन मुक्तासन करा. हे सर्व हिप्स आणि मांड्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतं. शवासन आणि काही मिनिटांसाठी प्राणायाम करा. लठ्ठ महिलांना योगाभ्यास करताना सावधपणे करणं गरजेचं असतं. अन्यथा नुकसान पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही एक्सरसाइज किंवा योगाभ्यास करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

कार्डियो

ज्या महिलांचं शरीर दुबळं किंवा बारिक असतं त्यांच्याऐवजी लठ्ठ महिलांनी वजन कमी करण्यासाठी आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्डियो करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये पटापट चालणं, काही मिनिटांसाठी स्ट्रेचिंग करणं आणि खांदे, गळा, पाठ यांना मजबुत करणारे एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. स्पॉट जॉगिंग, मानेचे व्यायाम, खांदे गोलाकार फिरवणं, पायांचे अंगठे पकडणं यांसारख्या एक्सरसाइज स्नायू बळकट करण्यासाठी मदत करतात. प्रत्येक आठवड्यात 5 ते 6 वेळा 45 मिनिटांसाठी हाय स्पीड ऐरोबिक वर्कआउट करा. यामुळे तुम्हाला स्टॅमिना, शरीर लवचिक होणं आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत मिळेल. नियमितपणे कार्डियो एक्सरसाइज केल्याने या बॉडि टाइपमुळे होणाऱ्या शारीरिक समस्या जसं हायपरटेंशन, डायबिटीज, हृदयरोग आणि ऑस्टिओपोरोसिस इत्यादी अगदी सहज कमी करणं शक्य होतं.

काय खाणं ठरतं फायदेशीर?

लठ्ठ शरीरयष्टी असणाऱ्या महिलांनी जेवणामध्ये जवळपास 30 टक्के कॉम्पलेक्स कार्ब्स, 45 टक्के प्रोटीन आणि 25 टक्के गुड फॅट्सचा समावे करणं फायदेशीर ठरतं. एकाचवेळी जास्त जेवण करू नका. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खा. तुमचा असा समज होऊ शकतो की, उपाशी राहिल्याने वजन कमी होतं. तर हा तुमचा गैरसमज आहे. उपाशी राहिल्याने आणखी वजन वाढतं. त्यामुळे प्रत्येक दोन ते तीन तासांनी काहीना काही हेल्दी खा.

काय खाणं टाळावं?

वजन जास्त असलेल्या महिलांनी आपल्या आहारामध्ये अधिक पौष्टिक आणि कमी फॅट्सचा समावेश करा. फॅट्स वाढवणारे हाय कॅलरी फूड्स आणि साखरेचे अधिक प्रमाण असणारे फूड प्रोडक्ट्स खाणं शक्यतो टाळाचं. सर्व प्रकारची शुगर (केळी, आंबा, द्राक्षं यांसारख्या फळांमध्ये असणारी साखर) आणि कार्ब्स म्हणजेच, पिठापासून तयार करण्यात आलेले प्रोडक्ट्स, पास्त, तांदूळ आणि बटाटा खाण्यापासून दूर राहा. हे काही असे खाद्यपदार्थ आहेत. जे अत्यंत वेगाने ब्लड शुगर लेव्हल वाढते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Fat or heavy body type women take care of your fitness by following these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.