तुमचे फेसबूक फ्रेण्डस तुम्हाला छळतात का?- तपासून पहा..

By Admin | Published: June 9, 2017 07:05 PM2017-06-09T19:05:11+5:302017-06-09T19:05:11+5:30

टवाळक्या करत आपली टाईमलाइन घाण करणाऱ्या दोस्तांचं काय करायचं?

Do your Facebook friends harass you? - Check them out. | तुमचे फेसबूक फ्रेण्डस तुम्हाला छळतात का?- तपासून पहा..

तुमचे फेसबूक फ्रेण्डस तुम्हाला छळतात का?- तपासून पहा..

googlenewsNext

निशांत महाजन 
मित्र तसे आपल्याला जानसे प्यारेबिरे असतात. त्यांचं आपण ऐकतो. पण काही मित्र अनेकदा आपल्याला ‘लाज’ आणतात. अगदी चारचौघात शोभा करतात आपली. आणि असं त्यावेळी कळत नाही की कुठं तोंड लपवावं. एरव्हीच्या जगात मग आपण अशा मित्रांनाही सुनावतो काहीबाही, पण आॅनलाइन जगात. फेसबुकवर आपले काही मित्र आपली अशी जाहीर शोभा करतात. त्य्त्यातून आपल्यालाच खाली मान घालावी लागते. त्यामुळे आताशा ट्रेण्ड आहे, अशा मित्रांनाच फेसबुकवर अनफॉलो करण्याचा. त्यांना कळत नाही, पण आपल्या टाइमलाइनवर त्यांचं काही दिसतही नाही. आणि आपल्या परवानगीशिवाय ते आपल्याला टॅगही करू शकत नाहीत. पण इतकं करतात काय हे मित्र? ही यादी पहा, आणि तुमचे मित्रही असंच काही वागतात का हे तपासून पहा..
१) आचरट, अश्लिल भाषेत मजूकर लिहितात. ना शेंडाबुडखा काहीही लिहितात. आणि त्यात आपल्याला टॅग करतात.
२) आपल्या पर्सनल गोष्टी फेसबुकवर लिहित बसतात, आपल्या म्हणजे, त्यांच्या, आपल्या, दोघांच्या, ग्रूपच्याही.
३) आपल्या टाइमलाइनवर येवून वाट्टेल ते प्रश्न विचारतात. काहीही बोलतात. फालतू जोक मारतात.
४) आपली खासी दोस्ती हे दाखवण्याच्या नादात आपला अपमान करतात. काहीही टोमणे मारतात.
५) आपल्याला कुठल्याही नावानं किंवा घरगुती नावानं संबोधतात.
६) उघडेवाघडे कसेही फोटो टाकतात.
७) आपल्याच वॉलवर येवून आपल्या एखाद्या दुसऱ्या मित्राला टार्गेट करतात.
८) आपल्या मैत्रिणींशी चावटपणा करतात, सलगी करतात, त्यांच्याशी फ्लर्ट करतात. किंवा त्यांना अपमानास्पद बोलतात.
९) हे एवढं किमान करणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आधी बोलून पहावं, त्यांनी ऐकलं तर ठीक. नाहीतर त्यांना अनफॉलो करावं. अनफ्रेण्ड करु नये.
१०) सध्या हा अनफॉलो ट्रेण्ड मोठा आहे, तुम्हीही तपासून पहा तुम्हाला कुणी अनफॉलो केलेलं नाही ना, ते!
 

Web Title: Do your Facebook friends harass you? - Check them out.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.