मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 07:07 PM2019-01-18T19:07:39+5:302019-01-18T19:11:02+5:30

अनेक पालकांची मुलांच्याबाबतीत एकच तक्रार असते की, मुलं जेवणाच्या आणि खाण्याच्या बाबतीत फार हट्ट करतात. तसेच अनेकदा ते चिंतेत असतात की, मुलांना घरातील जेवणाऐवजी जंक फूड आवडू लागले आहे.

Do you also think that children do not eat then think again once | मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा!

मुलं जेवत नाहीत, असं तुम्हालाही वाटतं का? पुन्हा एकदा विचार करून पाहा!

Next

अनेक पालकांची मुलांच्याबाबतीत एकच तक्रार असते की, मुलं जेवणाच्या आणि खाण्याच्या बाबतीत फार हट्ट करतात. तसेच अनेकदा ते चिंतेत असतात की, मुलांना घरातील जेवणाऐवजी जंक फूड आवडू लागले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येत आहेत. यामुळे लहान वयातच मुलांना अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. पण यावरही उपाय आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही घरातील जेवणामध्ये बदल करू शकता. 

विचारही आहे महत्त्वपूर्ण 

भारतीय आहारामध्ये विचारांना देखील महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. अनेकदा मुलांची काळजी करत असताना आपण घरातील वातावरणचं नकारात्मक करतो. त्याचा परिणाम आहारावर परिणामी घरातील लोकांच्या आरोग्यावर होत असतो. जाणून घेऊया अशा एका चुकीबाबत, जी चूक आपल्यापैकी बरेचजण ती चुक करतात. 

करतात अशी चुक :

अनेकदा मुलांना पोषक आहार देण्याच्या विचारात आपण हे विसरतो की, आपण त्यांना काय शिकवत आहोत. जर त्यांना जेवणाच्या डब्यामध्ये अर्धी चपाती परत आली तर त्यांच्यावर आरडाओरडा करण्यात येतो. त्याचा असा अर्थ काढण्यात येतो की, आज मुल जेवलचं नाही. पण खरं तर फक्त अर्धीच चपाती शिल्लक राहिली होती आणि अर्धी चपाती मुलांनी खाल्लेली असते. 

योग्य माहिती ठेवा 

प्रत्येक आई-वडिलांची ही जबाबदारी असते की, त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये. याबरोबर त्यांनी काय खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण त्यांना काय खाण्यासाठी देत आहोत? जर त्यांचं कौतुक करताना तुम्ही एखादं चॉकलेट खाण्यासाठी दिलं तर असं सिद्ध होतं की, चॉकलेटचा समावेश हेल्दी पदार्थांमध्ये होतो. अनेकदा मुलं आपल्या वागण्या बोलण्यातूनही अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे त्यांच्या जेवणावरून घरामध्ये गोंधळ घालण्याऐवजी त्यांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा. 

मुलांच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा :

कॅलरी :

पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना पूर्ण कॅलरी मिळणं गरजेचं असतं. ज्यामुळे मुलं अधिकाधिक सक्रिय राहतात. हाय कॅलरी देण्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही मुलांना तळलेले पदार्थ खाण्यासाठी द्याल. पण त्याऐवजी तुम्ही मुलांच्या आहारात दूध किंवा कडधान्य यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. 

प्रोटीन :

वाढत्या मुलांसाठी प्रोटीन आवश्यक असतं. मुलांच्या स्नायूंचा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी आणि  हाडांच्या मजबुतीसाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक असतं. यासाठी मुलांनी पनीरयुक्त खाद्य पदार्थ आणि अंडी, मांस, मासे हे पदार्थ खाणं अत्यंत उपयोगी ठरतं. 

व्हिटॅमिन्स अ‍ॅन्ड मिनरल्स :

मुलांच्या संपूर्ण विकासासाठी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक ठरतात. मुलांना अशा पौष्टिक पदार्थांची गरज असते. ज्यांमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. व्हिटॅमिन्स आणि आयर्नसाठी मुलांना अधिकाधिक हिरव्या पालेभाज्या खाण्याची आवश्यकता असते. 

फळं :

फळांमध्ये व्हिटॅमिन्स, आयर्न आणि इतर पौष्टिक त्त्व असतात. त्यामुळे मुलांना अधिकाधिक फळांचा ज्यूस आणि सीझन फळांचं सेवन करण्याची गरज असते. मुलांना द्राक्षं, सफरचंद, संत्री यांसारखी फळंही खाण्यासाठी देवू शकता. 

पाणी आणि फायबर :

मुलांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अशातच मुलांना अधिकाधिक पाणी पिण्यास सांगितलं पाहिजे. तसेच आहारामध्ये सूप आणि ज्यूस यांसारख्या द्रव्यस्वरूपातील पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे मुलांच्या आहारात फायबरयुक्त खाद्य पदार्थाचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. 

Web Title: Do you also think that children do not eat then think again once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.