वीकेंडला पूर्ण झोप न घेतल्यास पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:52 AM2018-05-24T10:52:55+5:302018-05-24T13:37:24+5:30

झोप पूर्ण घेत नाहीत. झोप पूर्ण न होणे हे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.

Do catch up on lost sleep on weekends otherwise it will increase mortality rate | वीकेंडला पूर्ण झोप न घेतल्यास पडू शकतं महागात

वीकेंडला पूर्ण झोप न घेतल्यास पडू शकतं महागात

googlenewsNext

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप फार गजरेची आहे. झोप पूर्ण न झाल्यास वेगवेगळ्या गंभीर आजारांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. बिझी शेड्यूल आणि बदलत्या लाइफ स्टाईलच्या भानगडीत लोक निष्काळजीपणा करतात आणि झोप पूर्ण घेत नाहीत. झोप पूर्ण न होणे हे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. यामुळे तुम्हाला कॅन्सर, डायबिटीज आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.  

स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या स्ट्रेस रिसर्च इन्स्टीट्यूट नुकताच एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात गेल्या वर्षात गोळा करण्यात आलेल्या 43, 880 लोकांच्या डेटाचं आकलन करण्यासात आलं. त्यासोबतच 1997 मध्ये स्वीडनमध्ये केल्या गेलेल्या लाइफस्टाईल आणि मेडिकल सर्व्हेमधून हेल्थ आणि झोपेशी संबंधीत सवयीचा डेटा कलेक्ट करण्यात आला होता. पण जर तुम्ही विकेंडला भरपूर झोप घेत असाल आणि इतरही वेळी पूर्ण झोप घेत असाल तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही.  

या अभ्यासातून समोर आले की, 65 वर्षांपेक्षा कमी वयांचे जे लोक वीकेंडला 5 तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांच्या मृत्यूचा दर जे विकेंडला 6-7 तास झोप घेतात यांच्यापेक्षा 52 टक्के अधिक होता. यासोबतच या वयोगटातील जे लोक आठवड्यातून कमी झोप घेत होते आणि विकेंडला जास्त, त्यांच्या मृत्यूचा दर त्यांच्या बरोबरीत होता जे लोक रात्री 6-7 तास झोप घेतात. 

या रिसर्चच्या आधारावर अभ्यासकांनी निष्कर्ष काढला की, रोज 8 तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने मृत्यू दर वाढू शकतो. अभ्यासकांच्या टीमने सांगितले की, त्यांनी 65 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांबाबतच हा अभ्यास केलाय.

Web Title: Do catch up on lost sleep on weekends otherwise it will increase mortality rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.