डायबिटीस रुग्णांनी भात खावा की नाही? वाचा तज्ञ काय सांगतात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:46 PM2024-03-05T12:46:57+5:302024-03-05T12:48:56+5:30

काहींना रोजच्या जेवणामध्ये भात खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही.

diabetes patient can eat rice or not know about expert opinion  | डायबिटीस रुग्णांनी भात खावा की नाही? वाचा तज्ञ काय सांगतात... 

डायबिटीस रुग्णांनी भात खावा की नाही? वाचा तज्ञ काय सांगतात... 

Health Tips : काहींना जेवणामध्ये भात खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. भाताशिवाय त्यांना जेवण केल्यासारखं वाटत नाही. पण जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशा रुग्णांसाठी भात खाणं किती चांगलं आहे ते जाणून घेऊया.

डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे ज्याची एखाद्याला लागण  झाली की त्या व्यक्तीला आयुष्यभर त्रास होतो. एखाद्याला डायबिटीस  झाला की खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागते. अशा रुग्णांना विशेषतः भाता खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

भारतात राहणाऱ्या लोकांसाठी हे थोडं कठीण आहे. भारतीय पदार्थांमध्ये भाताला विशेष स्थान आहे, तरीही आरोग्य सबाधित राहण्यासाठी लोकांना भात खाणं सोडून द्यावं लागतं. डॉक्टरांच्या मते, तुम्हाला भात पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, तर तुम्हाला भात शिजवण्याची खास पद्धत माहित असणे आवश्यक आहे.

तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे आणि जगातील अर्ध्या लोकसंख्येच्या दैनंदिन आहारात, विशेषत: आशियातील महत्त्वाचे स्थान व्यापलेले आहे. हा भारतीयांचा मुख्य आहार आहे.डायबिटीसच्या रुग्णांना भात खावा की नाही अशी शंका नेहमीच असते. साखरेच्या रुग्णांना विशेषतः पांढरा भात खाण्याबद्दल अधिक काळजी वाटते. तांदूळ हा मऊ, चवदार, पचायला सोपा आणि भरपूर ऊर्जा देणारा अन्न आहे. 

डायबिटीस असल्यास भात खायचा की नाही?

डॉक्टरांच्या मते, प्रत्येक १०० ग्रॅम तांदळात सुमारे ३४५ कॅलरीज असतात. पाहायला गेल्यास तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त असतो. त्यामध्ये फायबर, मायक्रोन्युट्रिएंट्स आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण देखील कमी असते. पण यानंतरही भात खाऊ शकतो. मात्र यासाठी त्याचे प्रमाण आणि दर्जा याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तांदूळ आहारात नियंत्रित प्रमाणात घेतले आणि त्यात भाज्यांचा समावेश केला किंवा तुमच्या आहारात सॅलेड किंवा भाज्यांचे सूप समाविष्ट केलं तर ते शरीरातील ग्लायसेमिक प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Web Title: diabetes patient can eat rice or not know about expert opinion 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.