'हाय ब्लड प्रेशर'च्या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 10:55 AM2019-06-14T10:55:33+5:302019-06-14T11:00:25+5:30

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि बदलणाऱ्या आहाराच्या सवयींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वचजण या आजाराच्या विळख्यात अडकले आहेत.

Dangerous effects of high blood pressure that one must know | 'हाय ब्लड प्रेशर'च्या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

'हाय ब्लड प्रेशर'च्या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Next

(Image Credit : The Heart Foundation)

बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि बदलणाऱ्या आहाराच्या सवयींमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वचजण या आजाराच्या विळख्यात अडकले आहेत. खासकरुन भारतात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची समस्या वेगाने वाढत आहे. या आजाराचं मुख्य कारण म्हणजे, धकाधकीची आणि बदलणारी जीवनशैली, स्ट्रेस, टेन्शन आणि थकवा. हाय ब्लड प्रेशरचा आजार अत्यंत घातक असून त्याला 'सायलंट किलर' असंही म्हटलं जातं. ब्लड प्रेशरचा आजार तसा तर सामान्य वाटतो, मात्र याला वेळीच कंट्रोल केलं तर यामुळे हृदयरोग, स्ट्रोक या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. ब्लड प्रेशरमध्ये अनेकजण अ‍ॅलोपॅथीक औषधांचा वापर करतात, पण याचे अनेक साइड इफेक्टही असतात. जेव्हा धमन्यांमध्ये रक्ताचा दबाव वाढतो, तेव्हा हृदयाला सामान्य क्रमापेक्षा अधिक वेगाने काम करावे लागते. यावेळी हृदयावर जे प्रेशर पडते. त्याला हाय ब्लड प्रेशर असं म्हणतात. 

हाय ब्लड प्रेशरमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामान करावा लागतो, जाणून घेऊयात याबाबत... 

1. हाय ब्लड प्रेशरचा सामना करत असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला जास्त ब्लड पंप करावं लागतं. यामुळे हृदयावर जास्त प्रेशर बनतं. हाय ब्लड प्रेशरमुळे कोरोनरी आर्टरी डिजीज आणि इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. 

2. ज्याप्रकारे आपल्या हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी शरीराती रक्त प्रवाह सामान्य आणि हेल्दी असणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे आपला मेंदूचा विकास होण्यासाठीही रक्त प्रवाह सुरळीत असणं आवश्यक ठरतं. परंतु जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं, त्यावेळी मेंदूच्या एका भागामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. 

3. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींना डिमेंशिया सारखा विसरण्याचा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. याव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशरमुळे ब्रेन हॅमरेजचा धोकाही 50 टक्क्यांनी वाढतो. 

4. किडनी शरीरामध्ये एका फिल्टरप्रमाणे काम करते आणि रक्तामधील घाण बाहेर टाकण्यासाठी मदत करते. परंतु हाय ब्लड प्रेशरमुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीपर्यंत जाणाऱ्या धमन्याही निकामी होतात. अशा परिस्थितीमध्ये किडनी शरीरातील रक्त फिल्टर करू शकत नाही आणि त्यामध्ये अस्वच्छ पदार्थांचा साठा तयार होतो. परिणामी किडनी निकामी होते. 

5. ब्लड प्रेशरमुळे किडनीसोबतच डोळ्यांवरही परिणाम होतो. हाय ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांमधील वेसल्स डॅमेज होतात. यामुळे डोळ्यांचा रॅटिनापर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये डोळ्यांमधून ब्लिडींग होऊ लागतं. एवडचं नाही तर डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. 

हाय ब्लड प्रेशरपासून बचाव करण्यासाठी काही उपाय : 

- दररोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी कार्डिओ एक्सरसाइज करा. म्हणजेच, ब्रिस्क वॉक, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, एरोबिक्स, डान्स इत्यादी. वॉक करताना एका मिनिटामध्ये 40 ते 50 पावलं, ब्रिस्क वॉक करताना एका मिनिटामध्ये  75 ते 80 पावलं आणि जॉगिंग करताना 150 ते 160 पावलं चालणं गरजेचं असतं. 

- हेल्दी डाएट घ्या आणि योग्य लाइफस्टाइल फॉलो करा. डाएटमध्ये हाय-फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जसं की, ज्वारी, बाजरी, गहू, दलिया आणि स्प्राउट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करा. याव्यतिरिक्त दररोज कमीत कमी 10 ग्लास पाणी प्या. 

- टेन्शन, थकवा आणि तणाव यांपासून दूर राहा. तुमचा मूड शांत ठेवण्यासाठी म्युझिकचा आधार घ्या किंवा डान्स करा. तुम्ही तुमच्या आवडीचं कामही करू शकता.


 
- फास्ट फूड, मॅगी, चिप्स, सॉस, चॉकलेट्स, सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजेच, शुद्ध तूप, डालडा किंवा नारळाचं तेल यांसारख्या पदार्थांपासून शक्य असेल तेवढं दूर राहा. 

- डाएटमध्ये मीठाचं प्रमाण कमीच ठेवा. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी मीठाचं जास्त सेवन करणं शक्यतो टाळावं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Dangerous effects of high blood pressure that one must know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.