तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 01:44 PM2018-08-09T13:44:42+5:302018-08-09T13:44:48+5:30

खोबऱ्याचं तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं. यातील औषधी तत्व आपलं आरोग्य, सौंदर्य आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल केस आणि त्वचेला नैसर्गिक पद्धतीनं मुलायम बनवतं.

Coconut oil can help you look younger | तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा 'असा' करा वापर!

तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा 'असा' करा वापर!

Next

खोबऱ्याचं तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं. यातील औषधी तत्व आपलं आरोग्य, सौंदर्य आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचं तेल केस आणि त्वचेला नैसर्गिक पद्धतीनं मुलायम बनवतं. तसेच केसांनाही चमकदार बनवण्यासाठी तुम्ही खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता. त्वचेला मॉयश्चराइझ करायचं असल्यासही खोबऱ्याचं तेल गुणकारी ठरतं. जाणून घेऊयात खोबऱ्याच्या तेलाचे असे फायदे जे तुमचं तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील...

1. खोबऱ्याचं तेल ड्राय स्कीनला मुलायम बनवण्यासाठी फायदेशीर असतं. आंघोळीच्या आधी खोबऱ्याच्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा आणि त्यानंतर आंघोळ करा. 

2.  डार्क सर्कल्स आणि सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर होतो. यामध्ये अॅन्टी-एजिंग तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. तेलाचे काही थेंब घेऊन डोळ्यांच्या खाली मसाज करा. 

3. खोबऱ्याचं तेल सनबर्नपासूनही त्वचेची रक्ष करते.

4. घामामुळे होणाऱ्या घामोळ्यांवरही खोबऱ्याचं तेल औषध म्हणून काम करतं. त्याचप्रमाणे खाज येत असेल तर त्यावर खोबऱ्याचं तेल लावल्यानं त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि पुन्हा खाज येत नाही. 

5. साखरेमध्ये खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब टाकून त्याचा स्क्रब म्हणून वापर करू शकता. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्कीन आणि टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

6. चेहऱ्यावरील पिम्पल आणि पुरळ किंवा एखाद्या जखमेचे व्रण घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. त्यामुळे व्रण दूर होतील.

7. मेकअप उतरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लिंजिंग मिल्कऐवजी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. कापसाचा बोळा खोबऱ्याच्या तेलात भिजवून त्याच्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप काढा. 

8. खोबऱ्याच्या तेलाने तुमच्या हाताच्या बोटांना मसाज करा. त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच नखांनाही मसाज करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे नखांच्या बाजूची स्कीन निघत नाही आणि नखांवर चकाकी येते. 

9. टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यासाठीही खोबऱ्याचं तेल गुणकारी ठरतं. खोबऱ्याच्या तेलामध्ये चिमुटभर हळद घालून ते मिश्रण टाचांवर लावा. असे केल्यानं टाचा मऊ होतात.

Web Title: Coconut oil can help you look younger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.