'हे' 4 फूड आहेत हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय, बाबा रामदेव यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 02:18 PM2024-03-16T14:18:23+5:302024-03-16T14:19:51+5:30

Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरमुळे मेंदुच्या नसा डॅमेज होऊ शकतात. ज्यामुळे स्ट्रोक येतो.

Baba Ramdev told to eat these 4 foods to normalize high blood pressure | 'हे' 4 फूड आहेत हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय, बाबा रामदेव यांनी दिला सल्ला

'हे' 4 फूड आहेत हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय, बाबा रामदेव यांनी दिला सल्ला

Blood Pressure : जगभरात जास्तीत जास्त मृत्यू हे हृदयरोगांमुळे होतात. याचं मुख्य कारण आहे बीपी म्हणजे हाय ब्लड प्रेशरची समस्या याला हायपरटेंशन असंही म्हणतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, 30 ते 79 वयातील साधारण 1.28 बिलियन लोक या आजाराचे शिकार आहेत. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, हाय ब्लड प्रेशर तुमच्या मेंदुसाठी किती घातक आहे.

मेंदुत बीपी वाढण्याची लक्षण

हाय ब्लड प्रेशरमुळे मेंदुच्या नसा डॅमेज होऊ शकतात. ज्यामुळे स्ट्रोक येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यात नसा फाटल्याने रूग्णाला कन्फ्यूजन, बघण्या-बोलण्यात समस्या, शरीर व चेहऱ्याच्या एका बाजूला सुन्नपणा, चालण्यात समस्या आणि वेदना होऊ शकतात. योगगुरू बाबा रामदेव यांनी बीपी नॉर्मल ठेवण्यासाठी 4 फूड्सबाबत सांगितलं आहे.

खारीक

ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी खारीक फार फायदेशीर असते. कमी सोडिअम आणि जास्त पोटॅशिअम असल्याने याचा आहारात समावेश केल्याने हायपरटेंशनपासून बचाव होतो. या फळात कॅल्शिअम, आयर्न, फॉस्फोरस आणि मॅगनीझ भरपूर असतं.

दालचीनी

दालचीनीचं सेवन केल्याने सिल्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. ही जडीबुटी हृदयाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर ठरू शकते. याने तुमच्या नसा रिलॅक्स होतात आणि ब्लॉकेजचा धोका वेगाने कमी होतो.

मनुके

मनुक्यांमध्ये पोटॅशिअम असतं जे रक्ताच्या धमण्यांना निरोगी बनवतं. अॅंटी-ऑक्सिडेंटच्या मदतीने हे ड्राय फ्रूट हाय बीपी कंट्रोल करू शकतं. तसेच याने कार्डियोवस्कुलर डिजीज आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

गाजर

गाजर एक प्लांट बेस्ड फूड आहे जे बीपी कंट्रोल करतं. वेगवेगळ्या शोधातून समोर आलं की, गाजर खाल्ल्याने बीपी लेव्हल नॉर्मल होते. यामागे फायबर आणि पोटॅशिअमची भूमिका आहे. तुम्ही याचा ज्यूसही पिऊ शकता.

Web Title: Baba Ramdev told to eat these 4 foods to normalize high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.