UTI पासून बचावासाठी महिला 'अशाप्रकारे' करताहेत पब्लिक टॉयलेटचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 11:08 AM2019-02-07T11:08:56+5:302019-02-07T11:11:10+5:30

अनेकदा तुम्ही दिवसभरासाठी बाहेर गेला असाल तेव्हा इच्छा नसूनही तुम्हाला पब्लिक टॉयलेटचा वापर करावा लागतो.

To avoid UTI women are using nasty public toilets in a smarter way but is it safe | UTI पासून बचावासाठी महिला 'अशाप्रकारे' करताहेत पब्लिक टॉयलेटचा वापर

UTI पासून बचावासाठी महिला 'अशाप्रकारे' करताहेत पब्लिक टॉयलेटचा वापर

Next

अनेकदा तुम्ही दिवसभरासाठी बाहेर गेला असाल तेव्हा इच्छा नसूनही तुम्हाला पब्लिक टॉयलेटचा वापर करावा लागतो. टॉयलेटमध्ये गेल्यावर तिथली अस्वच्छता, टॉयलेट सीटची झालेली घाणेरडी अवस्था पाहून त्यावर बसण्याचीही इच्छा होत नाही. पण बसावं लागतं. अशावेळी अनेक महिला टीशू पेपरचा शोध घेतात किंवा पर्समध्ये डिसइन्फेक्टेंटचा म्हणजे कीटकनाशक शोधतात, जेणेकरून टॉयलेट सीट स्वच्छ करता येईल. पण यातील काहीच तुमच्याकडे नसेल तर मन मारून तुम्हाला टॉयलेट सीटवर बसावं लागतं. सोबतच मनात सतत ही भीती असते की, कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये. 

काय आहे यूरिन इन्फेक्शन?

यूरिन इन्फेक्शन कोणत्याही वयामध्ये होऊ शकते. ज्या व्यक्ती जास्तीत जास्त वेळ यूरीन थांबवून ठेवतात त्यांना या समस्येचा सामना करावा लागू शकतो. कारण यूरीनमधून बॅक्टेरिया शरीरात जमा होऊन इन्फेक्शन होतं करतात. त्यामुळे अनेकदा गुप्तांगात खाज आणि जळजळ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

अस्वच्छ बाथरूमचा वापर करणं

अनेकदा अस्वच्छ बाथरूमचा वापर करणं हेदेखील यूरिन इन्फेकशनचं कारण ठरू शकतं. अस्वच्छ टॉयलेट सीटवर अनेकदा बॅक्टेरिया असतात. अशा टॉयलेट सीटचा वापर केल्याने यूरिन इन्फेक्शनसारखे अनेक आजार होऊ शकतात. 

ही पद्धत वापरतात काही महिला

काही महिला या मनात इन्फेक्शनची भीती न बाळगता आरामात टॉयलेट सीटचा वापर करतात. कारण त्यांनी टॉयलेट सीटवर असलेल्या जर्म्स आणि बॅक्टेरियापासून बचाव करण्याचा एक स्मार्ट उपाय शोधला आहे. हा उपाय आहे स्क्वॉटिंग. काही लोक टॉयलेट सीटवर स्क्वॉट करण्याऐवजी टॉयलेट सीटच्यावर स्क्वॉट करतात. म्हणजे त्या अशाप्रकारे टॉयलेट सीटचा वापर करतात की, टॉयलेट सीट आणि पार्श्व भागाचा थेट संबंध येऊ देत नाही.

एक्सपर्टनुसार हे योग्य नाही

हेल्थ एक्सपर्ट असं सांगतात की, टॉयलेटचा वापर करताना सेमी-स्क्वॉटिंग करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. कारण अशाप्रकारे सेमी स्क्वॉटींग करून टॉयलेट सीटवर बसल्याने मांसपेशी पूर्णपणे रिलॅक्स होत नाहीत. त्यामुळे लघवी होण्यासही त्रास होतो. अशात तुमचं ब्लेडर पूर्णपणे रिकामं होत नाही आणि काही लघवी आतच शिल्लक राहते. त्यामुळे तुम्हाला यूटीआयचा धोका होतो. 

नेहमी सोबत ठेवा या गोष्टी

यूटीआयपासून बचाव करण्यासाठी तुमच्याकडे एक उपाय आहे. तो म्हणजे तुमच्यासोबत सतत टॉयलेट पेपर ठेवा. जेव्हाही पब्लिक टॉयलेट वापराल तेव्हा टॉयलेट पेपर ठेवूनच टॉयलेट सीटवर बसा. जेणेकरून ब्लेडरची रिलॅक्स होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शनही होणार नाही.

यूरिन इन्फेक्शनची लक्षणं :

यूरिन इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात अनेक बदल घडून येतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- यूरिनमधून दुर्गंधी येणं
- कमरेच्या खालच्या भागामध्ये वेदना होतात.
- सतत लघवीला होणं
- भूख न लागणं
- थकवा येणं
- यूरिनचा रंग बदलणं

 

Web Title: To avoid UTI women are using nasty public toilets in a smarter way but is it safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.