चहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 02:23 PM2018-08-18T14:23:15+5:302018-08-18T14:24:08+5:30

अनेक जणांना सारखा चहा पिण्याची सवय असते. तसेच अनेकांची सकाळ चहानेच होते. अनेकदा ऑफिस मिटिंग  किंवा कामाचा ताण हलका करण्यासाठी सतत चहा पिण्यात येतो.

Avoid these things while doing tea | चहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल!

चहा करताना 'या' गोष्टी टाळाल तर आरोग्य चांगलं राखाल!

googlenewsNext

अनेक जणांना सारखा चहा पिण्याची सवय असते. तसेच अनेकांची सकाळ चहानेच होते. अनेकदा ऑफिस मिटिंग  किंवा कामाचा ताण हलका करण्यासाठी सतत चहा पिण्यात येतो. चहा म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. कोणतीही गोष्टीचं मर्यादेत सेवन केलं तर त्याचा आपल्या शरीरावर कोणताही विपरित परिणाम होत नाही. पण जर ही मर्यादा आपण ओलांडली तर मात्र ती गोष्ट आपल्या शरीरासाठी घातक ठरते. तसचं चहाच्या बाबतीतही होतं. पण याव्यतिरिक्त चहाच्या बाबतीत करण्यात आलेल्या काही  सामान्य चुकाही चहाला आपल्या शरीरासाठी घातक ठरवतात. त्यामुळे चहाच्या बाबतीत या चुका टाळणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात चहा करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत...

रिकाम्या पोटी चहा पिणं टाळावं -

सकळी उठल्याअनेक उठल्या  जणांना चहा पिण्याची सवय असते. सर्वात आधी चहा पिणं आणि त्यानंतर इतर कामांना सुरुवात करणं हा अनेकांचा ठरलेला दिनक्रम असतो. पण असं करणं शरीरासाठी घातक ठरतं. कारण असं केल्याने अॅसिडिटी आणि कॅन्सरसारखे आजार जडण्याची शक्यता असते. त्यासोबतच अनोशापोटी चहाचे सेवन केल्याने फार कमी वयातच तुम्ही म्हातारे दिसू लागता. त्यामुळे सकाळी उठल्यावर आधी एक ग्लास पाणी प्यावं आणि त्यानंतरच चहा घ्यावा. 

जेवणानंतर चहा पिणं टाळावं -

जेवल्यानंतर अनेक लोकांना चहा पिण्याची इच्छा होते. पण असं करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. जेव्हा आपण जेवतो त्यावेळी  त्या जेवणातील पोषक घटक शरीरापर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे जर जेवल्यानंतर तुम्ही लगेच चहा प्यायला, तर जेवणातील पोषक घटक शरीरापर्यंत पोहचू शकणार नाही. 

जास्त वेळ चहा उकळवू नका -

चहाला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच तो पिणं योग्य मानलं जातं. पण हेच शरीरासाठी घातक ठरतं. चहाला गरजेपेक्षा जास्त उकळवणं हे शरीरासाठी हानिकारक ठरतं. जास्त वेळ उकळवलेला चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ चहा न उकळवता, एक उकळी आल्यानंतर चहाचा गॅस बंद करावा. 

चहामध्ये औषधांचा प्रयोग करणं -

चहा तयार करताना त्यामध्ये काळी मिरी, सुंठ, तुळस, लवंग, जायफळ यांसारख्या औषधी पदार्थांचा वापर करण्यात येतो. या सर्व पदार्थांमध्ये शरीरासाठी औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. परंतु, चहामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफेन असते. त्यामुळे या औषधी पदार्थांमधील गुणधर्म चहामध्ये योग्य प्रमाणात उतरत नाहीत.

Web Title: Avoid these things while doing tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.