सकाळी झोपेतून उठल्यावर या गोष्टी टाळा आणि आरोग्य चांगलं ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 12:12 PM2018-04-17T12:12:32+5:302018-04-17T12:12:32+5:30

खासकरुन सकाळी दिवसाची सुरुवात करताना या गोष्टी जर आपण टाळल्या तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. 

Avoid these things in the morning and stay fit | सकाळी झोपेतून उठल्यावर या गोष्टी टाळा आणि आरोग्य चांगलं ठेवा

सकाळी झोपेतून उठल्यावर या गोष्टी टाळा आणि आरोग्य चांगलं ठेवा

(Image Credit: tegonity.com)

सकाळ झाली की आपण उत्तम आरोग्यासाठी विविध प्रकारच्या गोष्टी करतो. कुणी फिरायला जातात, तर कुणी जिमला जातो. आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही गोष्टी टाळणेही फायद्याचे ठरते. खासकरुन सकाळी दिवसाची सुरुवात करताना या गोष्टी जर आपण टाळल्या तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. 

सकाळी टाळा या गोष्टी:

स्मोकिंग- स्मोकिंग करणे आरोग्यासाठी नुकसानदायकच आहे, तरीही सकाळी उठल्यावर लगेच आपल्याला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर ती अजून धोकादायक आहे. याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

तंबाखू, मावा खाणे – अनेकजण टॉयलेटला जाण्याआधी तंबाखू, मावा किंवा गुटखा खातात. या गोष्टी आरोग्यास धोकादायक आहेत. त्यामुळे सकाळ असो किंवा दिवसा कधीही या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

अल्कोहल - सकाळी अल्कोहलचे सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशाने वाढत्या वयात होणार्‍या व्याधी आणि रोग आधीच शरीरात घर करू लागतात.

वाद-  सकाळी - सकाळी नको तो वाद. हे तर ऐकलं असेल. हे खरं आहे… सकाळी वाद केल्याने आपला मूड आणि दिवस दोन्ही खराब होतात. आपला मूड चांगला नसला तर त्याचा परिणाम आपल्यासोबत राहणार्‍यावर पडेल, आपल्या कामावर पडेल आणि ताण येईल.

मसालेदार आहार- सकाळचा आहार पौष्टिक असला पाहिजे. मसालेदार, चमचमीत आहाराने पोटात जळजळ होते आणि पचन‍क्रिया बिघडते. मग दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं.

लोळत राहणे – झोप झाल्यावरही आपण लोळत आहात तर हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. अशाने आळशीपणा वाढतो आणि स्फूर्ती मिळत नाही.
 

Web Title: Avoid these things in the morning and stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.