सर्जरीची भीती विसरा... जेलच्या मदतीने डोळ्यांच्या जखमेवर होणार उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 10:28 AM2019-03-28T10:28:36+5:302019-03-28T10:30:06+5:30

डोळ्यांना होणारी इजा किंवा समस्या म्हणजे रूग्णांसाठी मोठी अडचणच असते. शरीरातील सर्वात नाजूक अंगांपैकी एक म्हणजे डोळे.

American scientist made adhesive gel to repair eye injury without surgery | सर्जरीची भीती विसरा... जेलच्या मदतीने डोळ्यांच्या जखमेवर होणार उपचार!

सर्जरीची भीती विसरा... जेलच्या मदतीने डोळ्यांच्या जखमेवर होणार उपचार!

(Image Credit : NewsGram)

डोळ्यांना होणारी इजा किंवा समस्या म्हणजे रूग्णांसाठी मोठी अडचणच असते. शरीरातील सर्वात नाजूक अंगांपैकी एक म्हणजे डोळे. डोळ्यांना काही इजा झाली तर सर्जरी करणे म्हणजे कुणालाही भीती वाटणं साहजिकच आहे. पण आता डोळ्यांना झालेली जखम भरण्यासाठी जेलचा वापर केला जाऊ शकतो. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक असं जेल तयार केलं आहे ज्याच्या मदतीने डोळ्यांना झालेली जखमेवर उपाय म्हणून केला जाईल आणि त्यामुळे सर्जरी करण्याची गरज पडणार नाही. 

हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी याचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, जेलच्या मदतीने डोळ्यांच्या जखमा दूर करण्यासोबतच कॉर्निया पेशींना पुन्हा तयार केलं जाऊ शकतं.  

कसा होणार जेलचा वापर?

हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या ऑप्थेल्मोलॉजिस्च रेजा डाना यांनी सांगितले की, जेलमध्ये एका खासप्रकारचं रसायन आहे. जे कॉर्नियाच्या पेशींना एकत्र करतं आणि पुन्हा त्या तयार होण्यासही मदत करतं. वैज्ञानिकांनुसार, ड्रॉपर किंवा सीरिंजच्या मदतीने जेलचा वापर केला जाईल. हे जेल प्रकाशाच्या संपर्कात येताच घट्ट होतं. त्यामुळे हे लावल्यावर कॉर्नियाच्या पेशी वाढणं सुरू होईल आणि जेलसोबत मिसळून एकत्र होतील. 

'असा' झाला होता बदल

रिसर्चदरम्यान वैज्ञानिकांनी ३ मिमीचा कॉर्निया डिफेक्ट झाल्यावर २० टक्के जेलचा वापर केला गेला होता. साधारण ४ मिनिटांनंतर याचा प्रभाव बघायला मिळाला. एक दिवसांनंतर डोळ्यांवर पारदर्शी पडदा बघायला मिळाला. यादरम्यान कोणत्याही प्रकारची सूज बघायला मिळाली नाही. हळूहळू जवळपासच्या पेशींमध्ये वाढ झाली. वैज्ञानिक लवकरच मनुष्यांवर या जेलचा प्रयोग करू बघणार आहेत. 

जगभरात डोळ्यांची वाढती समस्या

जगभरात अंधत्वाचं सर्वात मोठं कारण म्हणजे कॉर्नियामध्ये इजा होणे हे आहे. दरवर्षी याच्याशी संबंधित १५ लाक केसेस समोर येतात. काही केसेसमध्ये कॉर्निया ट्रान्सप्लांटची गरज असते. ट्रान्सप्लांटनंतर इन्फेक्शन झाल्याच्याही अनेक घटना समोर येतात. त्यासोबतच अनेक केसेसमध्ये डोळे दुसरे कॉर्निया स्वीकारू शकत नाहीत. 

Web Title: American scientist made adhesive gel to repair eye injury without surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.